सिडकोत 70 हजारांचा मांजा जप्त cidco manja action

विक्री करणार्‍यांविरोधात गुन्हे शाखा युनिट- 2 ची कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
नायलॉन मांजाची विक्री करणार्‍यांविरोधात गुन्हेशाखा युनिट क्रमांक 2 ने कारवाई करत 70 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत नायलॉन मांजाचे 66 गट्टू आणि सात प्लास्टिक चक्री हस्तगत करण्यात आल्या आहेत. एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
उपनगर येथील जगताप मळा परिसरातील सूर्यसुंदर सोसायटीजवळ एका बंद फ्लॅटसमोर यश काळे हा नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून यश मनोहर काळे (वय 19, रा. सूर्यसुंदर अपार्टमेंट, जगताप मळा, उपनगर, नाशिक) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून मोनोफिल गोल्ड कंपनीचे विविध रंगांचे नायलॉन मांजाचे 66 गट्टू (बॉबीन) आणि सात प्लास्टिक चक्री, असा एकूण 70 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस हवालदार मनोज परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हेशाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समाधान हिरे, मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, जितेंद्र वजीरे आदी अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी केली.

cidco manja action

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *