मनमाड नगरपालिकेचे तीन
कर्मचारी लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
कन्स्ट्रक्शन्स फर्मच्या बिलाचा धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात 36 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मनमाड नगरपरिषदेच्या रोखपाल, वरिष्ठ लिपिकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराचे कनस्ट्रक्शन फर्मचे बिल मनमाड नगरपरिषदेकडे जमा करण्यात आले होेते. हे बिल काढून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक आनंद प्रभाकर औटी, रोखपाल संजय आरोटे, शिपाई नंदू पंडीत म्हसके, या तिघांनी 36 हजार रुपयाच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. आज दुपारी लाच घेताना या तिघांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक उपअधीक्षक नरंेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागूल, किरण अहिरराव, अजय गरुड, परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…