मालेगाव: प्रतिनिधी
मालेगाव मनमाड रोडवरील राजस्थान हॉटेल जवळ मनमाड कडून मालेगावच्या दिशेने येणारी महामंडळाची बस उलटल्याने अपघात झाला. या अपघातात बस मधील एकूण ४१ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२७) रोजी सायंकाळी सदर घटना घडली.
पुणे-शिंदखेडा बस क्र. एमएच २० बीएल ३१२६ ही मनमाड येथून मालेगावच्या दिशेने येत असताना राजस्थान हॉटेल जवळ बसचे ब्रेक लायनर चिटकल्याने बस जागीच उलटली. या बस मध्ये एकूण ४१ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. स्थानिकांच्या मदतीने जखमींना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…