मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक गोगड बिनविरोध

मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदी

राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक गोगड बिनविरोध

मनमाड :आमिन शेख

सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे सभापती म्हणुन नियुक्ती झालेले माजी आमदार संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमाड बाजार समितीची निवडणूक आज बाजार समितीच्या सभागृहात पार पडली यावेळी शिंदे गटातर्फे दशरथ लहिरे यांनी तर महाविकास आघाडीतर्फे गणेश धात्रक व दीपक गोगड यांनी अर्ज दाखल केला मात्र धात्रक क लहिरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने दीपक गोगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दीपक गोगड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असुन हेविवेट नेते छगन भुजबळ यांचे समर्थक आहेत.आज झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा आम्ही महाविकास आघाडीचा विजय झाला असुन आम्ही सगळेच सभापती असल्याचे मत नवनिर्वाचित सभापती दीपक गोगड यांनी व्यक्त केले.
मनमाड बाजार समितीची निवडणूक सहा महिन्यांपूर्वी झाली होती अत्यंत प्रतिष्ठतेची झालेली ही निवडणूक राज्यात गाजली होती विद्यमान आमदार सुहास कांदे विरुद्ध मंत्री छगन भुजबळ अशी लढत झाली होती यात छगन भुजबळ यांच्या पॅनेलने जोरदार मुसंडी मारली होती त्यावेळी माजी आमदार संजय पवार यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली होती मात्र मराठा आरक्षण व समाजाच्या भावना लक्षात घेत संजय पवार यांनी राजीनामा दिला होता.आज 30 नोव्हेंबर रोजी सभापती पदासाठी निवडणूक पार पडली मनमाड बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक झाली सभापती पदांसाठी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांनी तर शिंदे गटातर्फे दशरथ लहिरे यांनी अर्ज दाखल केला मात्र गणेश धात्रक व दशरथ लहिरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने गोगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी आयोजित छोटेखानी सत्कार समारंभात संचालक मंडळाने आपले मनोगत व्यक्त केले यात आम्हाला समाजाच्या नावाखाली तसेच इतर पध्दतीने अनेक प्रलोभने देऊन तसेच आर्थिक आमिष दाखवण्यात आले मात्र आम्ही एकही संचाकल विकल्या गेलो नाही त्यामुळेच आज दीपक गोगड सभापती होऊ शकले,गोगड यांनी आता चांगले काम करावे आम्ही सगळे सोबत आहोत असे मत व्यक्त केले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक विघ्ने व बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड यांनी कामकाज बघितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *