मनमाड उपजिल्हा रुग्णालयात विचारली जातेय जात…!
मनमाड: आमिन शेख
जाता जात नाही अशी ती जात” या म्हणीचा पूर्ण अनुभव सध्या मनमाडकर जनतेला येत असुन मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना त्यांची जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन याआधी देखील शेतकऱ्यांना रासायनिक खते घेताना त्यांची जात विचारली होती हे प्रकरण देखील मोठ्या प्रमाणावर गाजले होते मुळात उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा आणि जातीचा काय सबंध असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात असुन आता आमची जात बघुन तुम्ही उपचार करणार का..? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गुरुकुमार निकाळे यांच्यातर्फे विचारला जात आहे.राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा व्यापक जनआंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गुरुकुमार निकाळे यांनी दिला आहे.तर शासनाने दिलेल्या नियमांचे आम्ही पालन करतो त्यामुळे दिलेल्या कॉलम मध्ये आम्ही जातीचा उल्लेख असल्याने ती लिहतो असे मत उपजिल्हा रुग्णालयचे अधीक्षक डॉ पवन राऊत यांनी व्यक्त केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड मधील रहिवासी असलेले कल्याण धिवर हे आपल्या मुलीला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आले होते यावेळी त्यांना केसपेपर घेताना व इंजेक्शन घेण्यासाठी गेल्यावर सबंधित परिचारिका (सिस्टर ) यांनी जात विचारली यावेळी त्यांनी जात विचारण्याचा काय सबंध असा सवाल केला मात्र त्यांना शासकीय आदेश असल्याने आम्ही विचारले असे सांगाण्यात आले हा सर्व प्रकार त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गुरुकुमार निकाळे यांना सांगितला त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत याआधी देखील रासायनिक खते विकत घेताना शेतकऱ्यांना जात विचारली होती आता दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्याना जात विचारण्याचा काय सबंध आता तुम्ही आम्हाला जात विचारुन उपचार देणार का असा सवाल उपस्थित केला असुन राज्य सरकार हेतुपुरस्सर हे करत आहे शासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा व्यापक जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निकाळे यांनी दिला आहे.याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ पवन राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासकीय आदेश असुन त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगितले.
—————————————————————–
जात ही संकल्पनाच मोडीत काढावी…!
मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलो असता मला जात विचारली गेली मी याबाबत सबंधित सिस्टर डॉक्टर यांना विचारले मात्र केवळ आदेशानुसार काम करतो एवढंच उत्तर मिळाले यामुळे मलाही प्रश्न पडला याबाबत सखोल चौकशी व्हाव्ही व जात ही संकल्पना मोडीत काढावी. मुळात रुग्णांना जात का विचारली जाते असा आमचा प्रश्न आहे.
–कल्याण धिवर, उपचारासाठी आलेला नागरीक
—————————————————————–
शासनाने निर्णय मागे घ्यावा अन्यथा व्यापक जनआंदोलन..!
मागील काही दिवसांआधी शेतकऱ्यांना रासायनिक खते विकत घेण्यासाठी जात विचारली गेली याबाबत राज्यभर शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला असाच काहीसा प्रकार सध्या सुरू आहे रुग्ण उपचारासाठी येणार त्यांना त्यांची जात विचारण्याचं कारण काय तुम्ही आमची जात विचारून उपाचार करणार का..? शिंदे फडणवीस सरकारने त्वरित हा निर्णय मागे घेऊन केसपेपरवर जातीचा असलेला उल्लेख रद्द करावा अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारु..
–गुरुकुमार निकाळे सामाजिक कार्यकर्ते