मनमाडला ऐतिहासिक रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला…
सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही
मनमाड: प्रतिनिधी
मनमाड शहरांतून जाणारा इंदुर पुणे महामार्गावर असलेला रेल्वे ओव्हरब्रिज आज पहाटे कोसळला असुन सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही ब्रिटीशकालीन असलेल्या या पुलाचा मध्यभाग ढासळला असुन यामुळे इंदूर पुणे महामामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असुन या मार्गावरील पुण्यकडील वाहतूक येवला येथून तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे. मनमाड शहराला ऐतिहासिक वारसा असून मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेला ब्रिटिशकालीन पुल कोसळला असुन सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी या पुलाची मुदत संपली असल्याने त्याचे मागेच स्ट्रक्चर ऑडिट झाले होते मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नव्हती आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान या पुलाचा पूर्वेकडे असलेला मोठा भाग कोसळला यातून मातीचा असलेला मोठा भाग सुरक्षा कठडा साहित कोसळला यावेळी कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्याने दुर्घटना टळली आहे.
व महामार्ग सध्या बी ओ टी तत्वावर टोल कंपनीकडे…!
पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता गेल्या 15 वर्षांपासून हा पुल एम एम के पी एल या टोल कंपनीकडे बी ओ टी तत्वावर हसत्तांतरीत करण्यात आला आहे याचे देखभाल काम याच कंपनीकडे होते हा पूल आणि हा महामार्ग धोकादायक असुन बायपास करण्यात यावा अशी बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे मात्र याकडे राजकीय पक्ष तसेच सत्ताधारी सर्वांचे दुर्लक्ष होते.