डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल, उपचारांविना भिक्षेकरी महिलेचा मृत्यू
मनमाड : आमिन शेख
एकीकडे सरकार सर्वांसाठी आरोग्यसेवेच्या मोठ्या घोषणा करत असताना, दुसरीकडे मनमाड उपजिल्हा रुग्णालय प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे. हे रुग्णालय सध्या केवळ एक देखणी इमारत म्हणजेच शोपीस म्हणून उभे आहे. येथे गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. याशिवाय, रुग्णालयातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेकांना बाहेरून औषध विकत घेण्यासाठी लिहून दिले जाते, तर अनेकांना उपचारासाठी तासन्तास ताटकळत राहावे लागतेे. तीन दिवसांपूर्वी अपघात झालेल्या भिकारी महिलेला वेळेत औषधोपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
मनमाड उपजिल्हा रुग्णालय हे चांदवड, नांदगाव आणि येवला या तीन तालुक्यांसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. याशिवाय, शहरातून जाणारा व्यस्त असा इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग आहे. यामुळे येथे अपघाताचे प्रमाणदेखील अधिक आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर असते. असे असतानाही येथे दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नाही, मुख्य पद रिक्त असल्याने निर्णयप्रक्रियेत अडथळे येत आहेत. कर्मचार्यांची कमतरता, अनेक तांत्रिक आणि वैद्यकीय पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचार्यांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळेदेखील रुग्णांना औषधोपचार मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक डॉक्टर हे एडजस्टमेंट करून ड्यूटी करतात, याचाही मोठा फटका रुग्णांना बसतो, याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
रुग्णांची हेळसांड आणि रिक्त पदे
उपजिल्हा रुग्णालयात गरीब रुग्णांची लूट करण्यात येत आहे. अपघातग्रस्त किंवा गरीब रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळत राहावे लागते. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकदा रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते, जी त्यांच्या आवाक्याबाहेर असते. यामुळे रुग्णांची आर्थिक लूट होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात असलेले वैद्यकीय अधिकारी अर्थात एमएस पद हे क्लासवन दर्जाचे पद आहे. यांची नियुक्ती थेट मंत्रालयातून केली जाते. मी नुकताच प्रभारी म्हणून नियुक्ती घेतली आहे. याबाबत मी पाठपुरावा करून हे रिक्त पद भरण्यासाठी प्रयत्न करेल. याशिवाय, चार ते पाच दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– सतीश शिंपी, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक
Manmad Sub-District Hospital becomes a showpiece
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…