ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे कालवश
पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
नाशिक : प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, कादंबरी कार तसेच मराठी साहित्यात विपुल लेखन करून मराठी साहित्य क्षेत्रात आगळा वेगळा ठसा उमठवणारे मनोहर शहाणे यांचे आज निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दैनिक गांवकरी चे प्रकाशन असलेल्या अमृत चे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे, मराठी साहित्यात त्यांनी विपुल लेखन केले. विशेषतः कादंबरी, कथा लेखनात ते रमले. त्यांच्या इहयात्रा, उलुक, झाकोळ या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 1 मे 1930 ला नाशिकमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सराफी व्यवसाय करायचे. मात्र मनोहर शहाणे यांच्या बालपणीच पित्याचे छत्र हरपले. मनोहर शहाणे यांच्या आजी व आईने अतिशय गरीब परिस्थिती त त्यांना लहानाचे मोठे केले. शालेय जीवनापासूनच त्यांना साहित्य, लिखाणाची आवड होती, शाळेत असताना त्यांनी क्रांती ही नाटिका लिहिली होती. सुरवातीला रेशनिग खात्यात नोकरी केल्यानंतर 1949 साली त्यांनी दैनिक गांवकरीत मुद्रित शोधक म्हणून ते रुजू झाले, त्यानंतर साप्ताहिक गांवकरी चे संपादक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती,
मराठी भाषेतील गाजलेलं अमृत या नियतकालिकाचे उपसंपादक आणि 1958 पासून संपादक पद त्यांनी भूषवले, तसेच दैनिक गांवकरी, अमृत दिवाळी अंकाचे संपादन ही त्यांनी केलं, साहित्य समृद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या मनोहर शहाणे यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.त्यांच्या धाकटे आकाश व लोभ असावा आणि एखाद्याचा मृत्यू या कादंबरी ला महाराष्ट्र राज्य पारितोषिक, पूत्र नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिके मिळाली.
नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…
मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…
नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…
अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…
मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…
गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…