नाशिक

मविप्र ‘मॅरेथॉन’चा विजेता ठरला हरियाणाचा मनोज कुमार

नाशिकचा कमलाकर देशमुख हाफ मॅरेथॉनचा विजेता, पाच हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग

कडाक्याच्या थंडीत रविवारी (दि.11) पहाटे 5 वाजून 45 मिनिटांनी स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. वेगवेगळ्या 14 गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पाच हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविला.

गटनिहाय प्रथम तीन विजेते

1) फुल मॅरेथॉन (42.195 किलोमीटर) : मनोज कुमार (प्रथम, पानिपत, हरियाणा), सिकंदर चिंधू तडाखे (द्वितीय, नाशिक, महाराष्ट्र), चांगदेव हिरामण लाटे (तृतीय, अहिल्यानगर, महाराष्ट्र)
2) हाफ मॅरेथॉन (21 किलोमीटर) : कमलाकर लक्ष्मण देशमुख (प्रथम, नाशिक, महाराष्ट्र), राज राधेश्याम तिवारी (द्वितीय, मुंबई), रोहित वर्मा (तृतीय, रेवारी, हरियाणा).
3) महिला खुला वर्ग (10 किलोमीटर) : साक्षी अनंत कसबे (प्रथम, नाशिक, महाराष्ट्र), प्रियंका लालसू ओक्सा (द्वितीय, नाशिक, महाराष्ट्र), रिंकी धन्या पावरा (तृतीय, नंदुरबार).
4) पुरुष खुला गट (10 किलोमीटर) : सौरभ (प्रथम, हरियाणा), कृपाशंकर लालमणी कुमार (द्वितीय, नाशिक), अतुल शांताराम बर्डे (तृतीय, नाशिक).
5) 25 वर्षांआतील मुले (12 किलोमीटर) : कार्तिककुमार चाम्रूजी कारिहारपाल (प्रथम, नाशिक), दिलीप जनार्दन महाले (द्वितीय, नाशिक), रूपसिंग जन्या वसावे (तृतीय, नंदुरबार).
6) 19 वर्षांंआतील मुले (10 किलोमीटर) : गोविंद प्रकाश पाडेकर (प्रथम, नाशिक), सूरज जयराम माशी (द्वितीय, नाशिक), अनिल संजय जाधव (तृतीय, नाशिक).
7) 19 वर्षांआतील मुली (5 किलोमीटर) : पौर्णिमा बळवंत भोये (प्रथम, त्र्यंबकेश्वर, नाशिक), वंदना पंडित तुंबडे (द्वितीय, त्र्यंबकेश्वर, नाशिक), तेजस्विनी यशवंत भोये (तृतीय, नाशिक).
8) 17 वर्षांआतील मुले (5 किलोमीटर) : हर्ष प्रमोद पाटील (प्रथम, छत्रपती संभाजीनगर), साहिल प्रकाश पवार (द्वितीय, दिंडोरी, नाशिक), आकाश रामेश्वर राठोड (तृतीय, जालना).
9) 17 वर्षांआतील मुली (4 किलोमीटर) : लावण्या सुभाष नगरकर (प्रथम, चंद्रपूर), वैष्णवी संदीप आहेर (द्वितीय, नाशिक), रुचिका सुनील नगरकर (तृतीय, चंदपूर).
10)14 वर्षांआतील मुले (4 किलोमीटर) : प्रतीक प्रवीण जवळे (प्रथम, नाशिक), तेजस त्र्यंबक मोंढे (द्वितीय, अंजनेरी, नाशिक), आदित्य दिनेश पाटील (तृतीय, नाशिक).
11)14 वर्षांआतील मुली (3 किलोमीटर) : गौरी मनोज चौधरी (प्रथम, नाशिक), दिव्या विजय यादव (द्वितीय, नाशिक), कल्याणी बळवंत भोये (तृतीय, नाशिक).
12) 25 वर्षांआतील मुली (6 किलोमीटर) : ताई हिरामण बामने (प्रथम, नाशिक), पूजा प्रभाकर पारधी (द्वितीय, नाशिक), मोनिका जगन निल्पुंगे (तृतीय, नाशिक).
13) 60 वर्षांवरील पुरुष (6 किलोमीटर) : रवींद्र सूर्यभान पाटील (प्रथम, जळगाव), वसंत कचरू आहेर (द्वितीय, नाशिक), सूर्यकांत दामोदर भोसले (तृतीय, नाशिक).
14) 35 वर्षांवरील महिला (6 किलोमीटर): निवृत्ती दत्ता बोरसे (प्रथम, जव्हार), प्रीती राजेंद्र वाघ (द्वितीय, नाशिक), शीतल राहुल संघवी (तृतीय, नाशिक).
* दोन किलोमीटर ओपन फन रन. (ही स्पर्धा आरोग्य व सामाजिक विषयांवर होती.)

खेळाकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे. एखाद्या खेळामध्ये चांगली कामगिरी केल्यास अशा विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीची संधी असते. त्यासाठी पालकांनीदेखील मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मविप्र संस्था अशा मुलांच्या कायम पाठीशी असून, आवश्यक ते पाठबळ दिले जाते. मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि आयोजन समितीने अत्यंत सूक्ष्म व काटेकोर नियोजन केलेले होते.
– अ‍ॅड. नितीन ठाकरे, आयोजन समिती अध्यक्ष व मविप्र सरचिटणीस

 

42.195 किलोमीटर फुल मॅरेथॉनने स्पर्धेला सुरवात झाली. ऑलिम्पिक पदकविजेता योगेश्वर दत्त, आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे, रवींद्र देवरे, डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रवीण जाधव, लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, डॉ. प्रसाद सोनवणे, अ‍ॅड. आर. के. बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णाजी भगत, विजय पगार, रमेश पिंगळे, शोभाताई बोरस्ते, शालनताई सोनवणे, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, प्रा. सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर आदींंच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
फुल मॅरेथॉनमध्ये धावताना मनोज कुमार याने 2 तास 20 मिनिटी आणि 27 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
दिंडोरी (जि.नाशिक) तालुक्यातील सिकंदर चिंधू तडाखे या धावपटूने दोन तास 24 मिनिटे 49 सेकंद अशी वेळ नोंदवत दुसर्‍या क्रमांकाचे एक लाखाचे, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील चांगदेव हिरामण लाटे या धावपटूने दोन तास 24 मिनिटे 50 सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांकाचे 75 हजारांचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा स्पर्धक व प्रमुख मान्यवर हे दोन्ही खेळाडू हरियाणामधील रहिवासी आहेत, हा दुर्मिळ योगायोग आहे.
स्पर्धेसाठी देशभरातील उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील धावपटू, असे एकूण पाच हजारांवर स्पर्धक सहभागी झाले होते. नाशिकच्या सिकंदर तडाखे याने सलग तिसर्‍या वर्षीही दुसरा क्रमांक कायम ठेवत या स्पर्धेतील फुल मॅरेथॉनमध्ये दुसरा क्रमांक मिळविण्याची हॅटट्रिक केली. यावेळी एकूण आठ लाख 58 हजार रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
’मविप्र’चे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. प्राचायार्र् डॉ. कल्पना अहिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा, तर सौरभ टोचे, हेमंत काळे यांनी सत्कारार्थींचा परिचय करून दिला. डॉ. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी आभार मानले. क्रीडा संचालक मीनाक्षी गवळी, हेमंत पाटील, अनिल उगले, कल्पना नाईकवाडी, कैलास लवांड, प्रा. महेश कारे, डॉ. मंगल शिंदे यांनी विजेत्यांच्या यादीचे वाचन
केले.

Manoj Kumar from Haryana becomes the winner of MVP ‘Marathon’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago