मनसेचा आक्रमक पवित्रा, दरवाजाला चिटकवले निवेदन

मनसेचा आक्रमक पावित्रा, दरवाजाला चिटकवले निवेदन

नाशिकरोड: प्रतिनिधी
प्रभाग क्र २०. संदर्भात विविध समस्यांबाबत ॲड. नितीन पद्माकर पंडित शहर संघटक व मनसे पदाधिकारी, नवनियुक्त नाशिकरोड विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांना निवेदन द्यायचे होते त्या करीता सकाळी ११ वाजताची वेळ घेतली होती परंतु विभागीय अधिकारी न भेटताच निघून गेले व मनसे पदाधिकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दरवाजाला निवेदन चिटकवून निषेद व्यक्त केला . निवेदनात म्हटले आहे की नाशिकरोड येथील प्रभाग क्र २० मधील विविध समस्या आहेत.
प्रभाग क्र .२० च्या सद्गुरूनगर, शततारका सोसायटी जवळ महानगर पालिकेचे उद्यान खूप वाईट अवस्थेत आहे , उद्यानात जंगली झाडे व गवत वाढल्यामुळे सर्प व डास यांचा वावर आहे, उद्यानाच्या बाजूला कचरा व माती आहे त्यामुळे संपूर्ण परिसर अस्वछ आहे. उद्यानाच्या आजूबाजूला वस्ती आहे , उद्यानाचे सुशोभीकरण झाल्यास नागरिकांना व लहान मुलांना हे उद्यान वापरता येईल.
पावसाळा तोंडावर आला असताना प्रभाग २० मध्ये भालेराव मळा, डावखर वाडी ,सद्गुरू नगर, आकाश सोसायटी, पंचशील सोसायटी येथील चौफली व जयभवानी रोड, गुलमोहर कॉलोनी , कदम मळा येथे नाले साफ सफाई होत नसल्या कारनामे पावसाळ्यात रस्त्यावरती पाणी साठले जाते व नागरिकांची गैरसोय होते नागरिकांची गैरसोय होते.
गॅस पाईपलाईन करीता खोदलेल्या रस्त्या मुळे , रस्त्यावरती माती व दगडे आहेत त्यामुळे रस्तावरुन पायी चालणाऱ्या नागरिकांची व दुचाकीस्वारांची गैर सोय होते , त्यामुळे पंचशील सोसायटी चौफली, भगवती इमारती समोरील रास्ता ते फेर्नांडीस वाडी जवळ मारुती मंदिरापर्यंत डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे.
महावितरणाच्या विजेच्या तारांवरती झाडांच्या फांद्या आहे, पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे फांद्या तुटून तारांवर पडून वीज जाते व नागरिकांची गैरसोय होते.
सद्गुरूनगर ते डावखर वाडी कडे जाणारा रास्ता डांबरीकरण झाल्यानंतर मॅनहोलमुळे मोठं मोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे राती बेरात्री दुचाकी व चारचाकी वाहन चालवतांना त्रास होतो व अपघात होतात त्यामुळे मॅनहोल व रस्त्याचे लेव्हलिंग त्वरित व्हावे. यावेळी मनसे शहर संघटक ॲड. नितीन पद्माकर पंडित, पूर्व विधानसभा पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, कामगार नेते मनसे प्रकाश (बंटी) कोरडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मनविसे शशी चौधरी, उमेश भोई, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे, महिला विभाग अध्यक्ष , मीरा आवारे, शाखा अध्यक्ष ॲड. योगेश शिरसाट, शुभम बारी आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *