नाशिक

भाजपाने उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी घेतला दुसर्‍या पक्षाचा झेंडा

नाशिकरोड : वि. प्रतिनिधी
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण अगदी शेवटच्या क्षणाला केल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकरोड येथे पालिकेच्या विभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात उमेदवारांचे तुफान आल्याचे बघायला मिळाले. एबी फॉर्म मिळताच अधिकृत उमेदवारांच्या समर्थकांत जल्लोष बघायला मिळाला, तर काही इच्छुकांनी एबी फॉर्मसाठी देव पाण्यात घालूनही उपयोग न झाल्याने त्यांच्या गोटात नाराजी पसरली.

आमदार सरोज अहिरेंची खेळी

शिंदेंसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांची युती झालेली असतानाही प्रभाग 19 आणि 22 या दोन्ही प्रभागांत राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाने अधिकृत पॅनल उभे केले. हे दोन्ही प्रभाग देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे आमदार अहिरे यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार देऊन युतीतील शिंदेसेनेला मोठा झटका दिला आहे. याच प्रभागातून आमदार अहिरे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या आणि माजी महापौर नयन घोलप यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे येथे राजकीय लढत चुरशीची होणार आहे.

भाजपचे धक्कातंत्र

एबी फॉर्म देताना भाजपने सर्वांत जास्त धक्कातंत्राचा वापर केल्याने भाजपच्या गोटात सर्वांत जास्त नाराजी पसरली. भाजपमधून सर्वांत जास्त बंडाळी होऊ शकते. भाजपने ऐनवेळी पंडित आवारे, अंबादास पगारे, मीरा हांडगे या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. पंडित आवारे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. भाजपने यावेळी नवख्या उमेदवारांना संधी देण्याची चाल खेळली आहे. भाजपचे पदाधिकारी राजेश आढाव यांनाही भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनीदेखील अखेरीस शिंदेसेनेतून उमेदवारी अर्ज भरला. दक्षिण भाजप जिल्हा विभाग अध्यक्ष संदीप शिरोळे यांनाही एबी फॉर्म पक्षाने नाकारल्याने त्यांच्या समर्थकांतून बंडाळीचे संकेत दिले आहेत. भाजपचे अंबादास पगारे आपला अर्ज सर्वसाधारण गटातून अपक्ष ठेवणार असल्याचे समजते. त्यामुळे ते आपलेच सहकारी संभाजी मोरुस्कर यांच्यापुढे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत.

448 उमेदवारी अर्ज दाखल
नाशिकरोड विभागातील सहा प्रभागांतील 24 जागांसाठी आतापर्यंत 448 उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयास प्राप्त झाले. प्रत्यक्षात 798 उमेदवारी अर्जांची विक्री झाली.

Many took the flag of another party after BJP rejected their candidature

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago