जालना : जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला काल अचानक हिंसक वळण लागले. काल दुपारच्या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज तसेच आंदोलकांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केल्याने वातावरण चिघळले. याचे ठिकठिकाणी पडसाद उमटले असून, आंदोलकांनी वाहने आणि बसेस लक्ष्य करीत त्या पेटविल्या. धुळे- सोलापूर मार्गावर बसेस पेटवून देण्यात आल्या. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले असून, मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहागड बसस्थानकात उभ्या असलेल्या तीन ते चार बसेस आंदोलकांनी पेटवून दिल्या. या घटनेचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
नाशकात आज निदर्शने
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ नाशकात आज निदर्शने करण्यात येणार आहेत.
शरद पवारांची टीका
जालना येथे पोलिसांनी केलेल्या हवेतील गोळीबार आणि लाठीचार्जबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर तोफ डागली. गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पोलीस अशी कृती करु शकत नाही. असे म्हणाले. तर उपमुख्ंमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाने शांतता पाळावी, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारचीही भूमिका असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
जालन्यातील घटनेची माहिती आजूबाजूच्या परिसरात पोहोचताचं दुसर्या ठिकाणीही हिंसक गोष्टी बघायला मिळाल्या. धुळे-सोलापूर महामार्गावर एसटी बस पेटवण्यात आली. मात्र, ही बस कशामुळे पेटली यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे.
सिडको : दिलीपराज सोनार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात असलेल्या अमरधाम रोड नजीक एका…
पंचवटी : वार्ताहर म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर पार्क, बालकृष्णनगर, कंसारा माता चौक आणि शांतीनगर,…
जयपूर : एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रेलर आणि कारची समोरासमोर…
सिडको ः विशेष प्रतिनिधी उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या तीरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या महाकाय वटवृक्षाच्या…
सिन्नर : प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिन या कालावधीत…
सिन्नर : प्रतिनिधी स्वत:ला ज्वलनशील पदार्थाने पेटवून घेत पत्नी आणि सासूला मिठी मारून त्यांना जीवे…