मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांची रुई येथे प्रतिकात्मक अंत्ययात्रा

मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांची रुई येथे प्रतिकात्मक अंत्ययात्रा

लासलगाव:समीर पठाण

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत.त्यांना राज्यभरातून प्रचंड समर्थन मिळत आहे.निफाड तालुक्यात हे आंदोलन तीव्र झाले असून रुई ता.निफाड येथे मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

आज दि.३१ सायं ६ वाजता रुई येथील चौकात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ जमा झाले होते.याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस,मंत्री छगन भुजबळ,नारायण राणे,गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिकात्मक तिरडी बनवून हिंदू रितिरिवाजाने अंत्यसंसकर करण्यात आले.याप्रसंगी योगेश पोटे यांनी पाणी दिले तर अंकुश
डोंगरे,भागवत तासकर,नवनाथ तासकर,अनिल खडांगळे, विलास गायकवाड,किरण रोटे,दिनकर खडांगळे,केदा रोटे, भागवत ठोंबरे,कैलास तासकर,ओमकार तासकर यांनी अग्निडाग दिला.लीलाबाई तासकर,हिराबाई कणसे,लीलाबाई रोटे, लंकाबाई तासकर,कविता गायकवाड,मनीषा रुकारी,मंगल जाधव यांनी शोक व्यक्त केला.

याप्रसंगी कु.वैष्णवी हिंगे हिने मनोगत व्यक्त केले. आंदोलनात अंकुश तासकर,योगेश पोटे,ज्ञानेश्वर डोंगरे, सुनिल शिंदे,भागवत तासकर,केदारनाथ रोटे,अनिल खडांगळे,भागवत ठोंबरे,ओम तासकर,शमशुद्दीन काद्री, संजय पोटे,नवनाथ तासकर,भाऊसाहेब तासकर,महेश खडांगळे,विनायक गायकवाड,संदीप गायकवाड,अर्जुन घोटेकर,आण्णासाहेब गायकवाड,बापु रोटे,अमजद शेख, वसंत तासकर,गोरख तासकर,शुभम गवळी,रामेश्वर तासकर यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *