मोठी बातमी : जरांगे पाटील यांचे उपोषण मागे
सरकारला दिली दोन महिन्यांची मुदत
जालना : गेले नऊ दिवसांपासून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी काल मागे घेतले. शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनुसार दोन महिन्यांची मुदत जरांगे यांनी दिली. 2 जानेवारीपर्यंत सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीला सरकारच्या शिष्टमंडळाने मान्यता दिली. या शिष्टमंडळात सरकारतर्फे मंत्री उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे, धनंजय मुंडे, आ. बच्चु कडू यांच्यासह निवृत्त दोन न्यायमूर्ती सहभागी होते. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरी गावोगावी साखळी उपोषण मात्र सुरू राहणार आहे.