राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका

श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार

नवी दिल्ली :
भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून काल (दि.1) करण्यात आली. श्यामची आई हा सिनेमा ’सर्वोकृष्ट मराठी चित्रपट’ ठरला. राष्ट्रीय पुरस्कारांची समितीने माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांना यासंदर्भातील अहवाल सादर केला होता. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्यूरीने विजेत्यांची घोषणा केली.
अमृता फिल्म्स, पुणे फिल्म कंपनी, भालजी पेंढारकर आणि आल्मंड्स क्रिएशन्स प्रस्तुत श्यामची आई (मराठी) हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजींच्या बालपणावर आधारित आहे. हा चित्रपट 1953 साली प्रदर्शित झालेल्या त्याच नावाच्या जुन्या चित्रपटावर आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कारांत ’सर्वोत्तम अभिनेत्री’चा पुरस्कार राणी मुखर्जी हिला तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना ’सर्वोत्तम अभिनेत्याचा’ पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, ’12वी फेल’ या चित्रपटाला ’सर्वोत्तम फिचर फिल्म’चा पुरस्कार मिळाला.राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांची नावे सर्वोत्तम अभिनेत्री आणि अभिनेता म्हणून अगोदरच चर्चेत होती. मात्र शाहरुख खानने आपल्या ’जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून चाहत्यांना मोठा सरप्राईज दिला. राणी मुखर्जी, शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे.या तीन कलाकारांव्यतिरिक्त सान्या मल्होत्राच्या ’कटहल’ चित्रपटाला सर्वोत्तम हिंदी फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. रणबीर कपूरचा ’अ‍ॅनिमल’ चित्रपटाने साउंड डिझाईन आणि बॅकग्राउंड स्कोअर या दोन विभागांत पुरस्कार पटकावले. अदा शर्माच्या ’द केरळ स्टोरी’साठी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. विक्की कौशलच्या ’सॅम बहादूर’ला सर्वोत्तम मेकअप आणि कॉस्ट्युम डिझाईनचा पुरस्कार मिळाला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *