कसारा घाटातून ‘लाल वादळा’ची आगेकूच
नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय किसान सभेतर्फे जमिनीचे हक्क, वनपट्टे आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने मार्च निघाला आहे. दिंडोरीतून निघालेला हा मार्च आता कसारा घाटातून मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होते आहे. ’आता माघार नाही, थेट मंत्रालय गाठणार’ असा पवित्रा किसान सभेने घेतला आहे. मोर्चातील शिष्टमंडळाची मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा निष्पळ ठरल्यानं 3 फेब्रुवारीला 20 हजारहून अधिक शेतकरी आणि शेतमजूर मुंबईत धडकणार आहेत.
राज्य सरकारने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, वन जमीन आणि गायरानधारकांना स्वतंत्र सातबारा उतारे द्यावेत, शिक्षणाचे खासगीकरण थांबावं आणि पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी स्थानिक नागरिकांना द्यावं या मागणीसाठी माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान
अखिल भारतीय किसान सभेतर्फे मार्चची सुरुवात दिंडोरी तालुक्यातून झाली आहे. यात दिंडोरीसह सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यासारख्या आदिवासीबहुल भागांतून हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. मंगळवारी राज्य सरकारतर्फे मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुंबईत मंत्रालयात चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे. शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, इरफान शेख, किरण गहला, सुनील मालुसरे, भिका राठोड आदींचा समावेश आहे.
अंमलबजावणीतील त्रुटींमुळे लाँग मार्च
2019 आणि 2023 मध्ये अशाच प्रकारचं लाल वादळ मुंबईच्या दिशेनं झेपावलं होतं. प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली समिती नेमल्या गेल्या होत्या. पण केवळ आश्वासनं मिळालं. मात्र जमिनीचे प्रलंबित वनपट्टे आणि गायरान जमिनीचा सातबारा प्रत्यक्षात हातात न पडल्यानं आदिवासींचा व्यवस्थापनेवरचा विश्वास उडाला आहे. आश्वासनाच्या अंमलबजावणीतील त्रुटीमुळं हा तिसरा मार्च निघाला आहे, असं अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितलं.
March to hit Mumbai on February 3