सटाणा: प्रतिनिधी
माझ्या पत्नीला मामी म्हणायचे नाही, अशी कुरापत काढून भाजीपाला विक्रेत्याने ग्राहकाला एक किलो वजनाच्या लोखंडी मापाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बागलाण तालुक्यातील वटार येथे घडली आहे.याबाबत सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
अशोक भुरमल खैरनार (42) रा.वटार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक खैरनार दि.4 रोजी कांदे विकण्यासाठी उमराणे मार्केट येथे गेले होते.सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परत जात असताना वटार गावाचा आठवडे बाजार असल्याने एका दुकानात बटाटे , गिलके , दोडके विक्रीस होत. त्या दुकानात जाऊन अशोक खैरनार म्हणाले मामी दोडके द्या याचा भाजीपाला विक्रेत्याला राग आल्याने माझ्या पत्नीला मामी म्हणायचे नाही असे बोलून कुरापत काढून भाजीपाला विक्रेत्याने अशोक खैरनार यास शिवीगाळ करुन 1 किलो लोखंडी वजनाच्या मापाने मारहाण करून बेशुद्ध पाडले.
याबाबत सटाणा पोलिस ठाण्यात अशोक खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संजय ठगा खैरनार व दीपक संजय खैरनार या दोन्ही पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सटाणा पोलिस करत आहेत.