नाशिक

‘व्हॅलेंंटाइन डे’साठी बाजारपेठांमध्ये बहर

तरुणाईमध्ये रोझ, गिफ्ट, चॉकलेट, पार्टीचा उत्साह

नाशिक ः प्रतिनिधी
शनिवारी (दि.14) साजर्‍या होणार्‍या ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध लागले असून, तरुणाई आपापल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे
फूल, गिफ्ट, चॉकलेट आदी देत पार्टीचे प्लॅनिंग करीत असल्याचे चित्र आहे.
फेब्रुवारी महिना लागला की, तरुणाईला व्हॅलेंटाइनचे वेध लागतात. सध्या व्हॅलेंटाइन आठवडा सुरू असून, रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाइन डे असे साजरे केले जाते.
यातील प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असल्याने त्या त्या दिवशीच्या वस्तू भेट दिल्या जात असून, आपल्या प्रियजनांसाठी हटके गिफ्ट देण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. त्यासाठी ऑन आणि ऑफलाइन बाजारात फेरफटका मारला जात असून, व्हॅलेंटाइनच्या दिवशी खास गिफ्ट ऑर्डर करण्याचाही ट्रेंड दिसून
येत आहे.
यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, गिफ्टिंगसाठी नवनवे पर्याय शोधले जात आहेत. शहरातील कॉफी शॉप्स्, कॅफेमध्ये कपल्ससाठी खास डेकोरेशन करण्यात आले असून, सेल्फी, म्युझिक, खास मेनू, लायटिंग, कँडल लाइट डिनर आदींचे आयोजन करण्यात आले असून, विशेष सवलतीही देण्यात आल्या आहेत.
फुलांचे बुके, चॉकलेट, गिफ्ट हॅम्पर आणि कस्टमाइज वस्तूंना मागणी असून, टेेडी बिअर, ग्रीटिंग कार्ड यांना मागणी आहे.
पानाफुलांचे डेकोरेशन केलेले केक, प्रेमाचे प्रतीक म्हणून अनेकविध चॉकलेट्स तसेच खास पॅकिंग केलेल्या गिफ्ट्सना पसंती दिली जाते.

Markets boom for Valentine’s Day

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago