संशयितास अटक; पोलिस कोठडी
निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपरी येथे 5 सप्टेंबरला सकाळी 36 वर्षीय विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृत महिलेचे नाव सुजाता संतोष आहेर (वय 36, रा. पिंपरी) असे आहे. साहेबराव धनराज आहेर यांच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मृत महिलेच्या भावाने पोलिसांना दिली आहे.
याबाबत माहिती मिळताच निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतिलाल पाटील पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानंतर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर करीत आहेत. दरम्यान, सदर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. यात चिठ्ठीत सदर महिलेने म्हटले आहे की, नीलेश साहेबराव आहेर याने दोन वषार्ंपासून शारीरिक, मानसिक त्रास दिला आहे. तसेच विनयभंग केला आहे. तो गावात माझी बदनामी करत आहे. याबाबत कोणाला सांगितले तर याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकी देत असे. याबाबत माझ्याकडे काही पुरावा नाही. त्यामुळे मी कुणालाही काही सांगू शकत नाही. मी या त्रासाला कंटाळून शेवटचे पाऊल उचलत आहे. माझ्या मृत्यूबाबत सासरच्या मंडळींचा काही सहभाग नाही. माझे पती, सासू व सासरे यांना कुणीही त्रास देऊ नये. मला त्रास देणारा नीलेश आहेर याला कठोर शिक्षा द्यावी, ही माझी अंतिम इच्छा आहे. संशयित नीलेश आहेर यास निफाड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…