माथाडी कामगारांच्या संपामुळे बाजार समितीचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

लासलगाव :  प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी आज बुधवारी माथाडी कामगारांनी राज्यव्यापी एक दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे आज सकाळ पासूनच बाजार समित्या बंद असल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद असल्याने याचा परिणाम भाजीपल्यासह अन्य शेतमालाच्या पुरवठ्यावर होणार आहे.लासलगाव बाजार समितीत आज बुधवारी सकाळ पासूनच शुकशुकाट दिसून आला

लासलगाव शहरातील मेन रोड वर दररोज मोठया प्रमाणावर ट्रॅक्टर सह अन्य मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी असते मात्र आज सकाळ पासून रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.परिसरातील काही शेतकऱ्यांना माथाडी कामगारांच्या संप असल्याचे माहीत नसल्याने त्यांनी बाजार समितीत ट्रॅक्टर मधून कांदे विक्रीला आणले आहे तसेच आजची आवक व उद्या ची आवक ही दुपटीने वाढ होणार की काय असे चित्र दिसत आहे याचा परिणाम दरावर होती की काय असे अशी चिंता कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

सदर संप माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.माथाडी कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *