आपण नेहमी उठल्यावर प्रार्थना करतो, प्रभू तू दयाळू कृपावंत दाता या वाक्यात मला नेहमी देवाबद्दलची कृतज्ञता व्यक्त होताना दिसते. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आजचा दिवस आपला चांगला जावो आणि तो चांगला गेला याबद्दलही आपण नेहमी देवाजवळ कृतज्ञता मानतो. तसं तर आपण सार्या सृष्टी बद्दल कृतज्ञता ठेवायलाच हवी. प्राणवायू, निसर्ग, शेती, झाडं, फळं फुलं, अन्नपदार्थ, प्राणी इ इ.
आपण नेहमी आई-वडील, भावंड, शेजारीपाजारी, मित्र, भावंडं, आपली मुलं यांनी आपल्याला केलेली मदत, प्रेम याबद्दल नेहमी कृतज्ञता भाव ठेवतो. आपली संस्कृती तर चराचरावर, निसर्गावर, प्राणिमात्र अगदी गाय, बैल, कुत्रा असो, पृथ्वी, माती, शेती याबद्दल पूज्य भाव ठेवायला शिकवते.. हल्ली काय ते थँक्स गीविंग डे आलेले आहे तरी पण आपण ही लहान मुलांनासुद्धा कोणी काही मदत केली तर थँक्यू किंवा धन्यवाद म्हणायला शिकवतो.. ती एक प्रेमळ भावना आहे जी तुमच्याबद्दल तर चांगल मत करते पण एवढ्या छोट्या कृतीने दुसर्याच्या हृदयातही घर करून जाते..
खूप जण आपल्या देवाला, बॉसला, बायकोला, कामवाल्या बाईंना, जीवनातील महान व्यक्तींना, शिक्षकांना थँक्स म्हणतातच. कारण त्यांच्यामुळे ही सृष्टी, हे घर, कार्य किंवा आपली नोकरी विनासायास चालते. पण त्याबद्दल कृतज्ञता दाखवणे हाच खरा मोठेपणा आहे… लोकांच्या चांगुलपणाची दखल घेणं म्हणजे कृतज्ञताभाव! लहान गोष्टीत त्यांना मोठेपणा देणे म्हणजे कृतज्ञता! साधं उदाहरण घ्या! माझ्या घराजवळ छान छोटीशी बाग आहे..तेथील फुलं, पक्षी, येणारी लहान मुलं, बघतांना मला खूप भारी वाटतं… मी माझ्या मनातला राग, एकटेपणा, दुःख तिथे विसरू शकते! माझा दिवसभराचा कंटाळा तेथे नाहीसा होतो. मी खरंच दररोज त्या बाबतीत स्वतःला भाग्यवान समजते आणि म्हणून कृतज्ञता देतेच देते, थँक्यू म्हणतेच म्हणते….
माझे मित्र-मैत्रिणी, लेखन ग्रुप, शिक्षक, आई-वडील, शेजारी या लोकांनी मला वेळोवेळी खूप मदत केली आहे! काही अनुभव शिकवणही दिली आहे.. त्यामुळे आजही मी त्यांच्याप्रति कृतज्ञ आहे! ती संवेदना जिवंत व खरी आहे! आणि असणारच आहे… त्यातच आपल्याला मानसिक आनंद मिळतो हेच मानसिक आरोग्य चांगलं असण्याचे लक्षण आहे…
त्याचाही आपल्या मानसिक आरोग्यावर नकळत त्याचा परिणाम होतो.. काही वेळा तणाव आला की आपण दीर्घ श्वसन करून योगातही दैवीशक्तीला आवाहन करतो आणि कृतज्ञतेने भावपूर्ण साष्टांग दंडवत करतो.. शतशः नमन करतो! एकूण काय त्या दैवीशक्तीशी किंवा इथल्या चराचराशी आपले संबंध सुरळीत राहावे, सुधारावे, प्रेम मिळावे, आनंद वाटला आणि आनंद वाढतो, प्रेमही वाढते आपुलकी वाढते, एवढ्या सगळ्यासाठी हा कृतज्ञता भाव गरजेचा आहे तो सतत मनात असायलाच हवा आणि तुम्ही आनंदात असण्याचं तेच एक मोठं कारण असेल किंवा कृतज्ञ असण्याची भावना ठेवली तर तुमच्या जगण्यात सकारात्मक नक्की बदल होईल! बघा एकदा आपल्या स्वतःसाठी आपण स्वतःला थँक्यू म्हणून बघूया!
शेवटी एकच..
हे गुरुमाउली,
कृतज्ञता राहू दे अंतरी…
जसे आपण देवाबद्दल कृतज्ञ राहाो तसेच एकमेकांप्रतिही राहूया!
Mental health gratitude
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…