म्हसरूळला तरुणाची हत्या
एकजण पळून गेल्याने जीव वाचला
नाशिक: शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून एकीकडे पोलिसतील लाचखोरी वाढली असतानाच गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे.
म्हसरुळ परिसरातील सावकार गार्डन आकाश पेट्रोल पंप जवळ रात्री उशिरा २४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. यश रामचंद्र गांगुर्डे असे मृताचे नाव आहे. त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. तर त्याचा मित्र तिथून पळाल्याने तो वाचला. जुन्या वादातून या युवकाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.याबाबत म्हसरूळ पोलिस पुढील तपास करत आहेत.