बालिकेला वाचवतांना मायलेकीचा मृत्यू

 

बालिकेला वाचवतांना मायलेकीचा मृत्यू

■ मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी आणि शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या ३ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला आहे. ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियंका नवनाथ दराणे वय २३, वेदश्री नवनाथ दराणे वय ३ असे दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे. दोघीही जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. विहिरीला कठडा नसल्याने जवळ गेलेल्या बालिका विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी आईने धाव घेतली. यामध्ये दोघींचा मृत्यू झाला अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. मंगळवारी भावली धरणात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच ही घटना घडल्याने इगतपुरी तालुक्यावर दुःखाचे सावट आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

1 day ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

3 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

3 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

3 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

5 days ago