सिव्हिलमधील यंत्रणा दहा महिन्यांपासून बंद
नाशिक ः देवयानी सोनार
प्रसूतीनंतर आईला येणारे पहिले दूध हे बाळासाठी संजीवनी देणारे, लसीकरणासारखे काम करते. बाळाला विविध आजारांपासून दूर ठेवते. परंतु बदलती जीवनशैली किंवा शारीरिक काही कारणांमुळे आई बाळाला दूध पाजू शकत नाही. त्यावेळी इतर पर्याय वापरले जातात. परंतु ते सर्वांनाच शक्य नसल्याने मिल्क बँकसारखे उपक्रम फायदेशीर ठरत आहेत.
गत वर्षी 30 मे 2022 ला जिल्हा रुग्णालयात शहरातील सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने मिल्क बँक सुरू करण्यात आली होती. परंतु अवघ्या पंधरा दिवसातच मशिनरी बंद पडली. तेव्हापासून बंद झालेली ही मिल्क बँक आजतागायत बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे. दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मिल्क बँकेला प्रतिसाद वाढता होता. पंधरा दिवसात 50 ते 60 बालकांना याचा लाभ झाला होता.
याबाबतील स्वयंसेवी संस्थांनी सीएस आर फंड मिळाल्यास त्वरित अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करण्यात येईल, असे ‘गांवकरी’शी बोलताना सांगितले.
नोकरी करणार्या महिला किंवा इतर महिलांच्या चिमुकल्यांसाठी नाशिकमध्ये मिल्क बँक असावी या उदात्त हेतूने रोटरीने पुढाकार घेऊन सीएसआर फंडातून तसेच पालिका आणि स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ सदस्यांच्या सहकार्यातून मानवी दूध बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. जीवनाला आधार देणार्या मातेच्या दुधाची गरज असलेल्या अर्भकांना मदत ठरेल, या हेतूने जिल्हा रुग्णालयात ही मिल्क बँक सुरू करण्यात आली होती. त्यासाठी रोटरी क्लब नाशिकला एम.एस.एल. ड्राइव्हलीन सिस्टिम लिमिटेड या कंपनीने मदत केली. कंपनीसोबत सामंजस्य करार करून रोटरी वात्सल्य मातृ-दुग्ध पेढी स्थापन केली. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाने जागाही उपलब्ध करुन दिली. परंतु बँक सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच मशिनरी बंद पडली. ती आजतागायत बंदच आहे. त्यामुळे बालकांना दुधापासून वंचित रहावे लागत आहे.
मिल्क बँकेची गरज
आईचे दूध नवजात बालकांना जीवनदायी असते जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केली आहे की, बाळाच्या जन्मापासून ते सहा महिने वयापर्यंत केवळ आईचेच दूध बाळास पाजावे. पण काही वेळा अशी परिस्थिती असते जेव्हा अर्भक हे अमृत देणार्या जीवनापासून अर्थात दुधापासून वंचित असते.जसे, बाळाच्या जन्मावेळी मातेचा मृत्यू होतो. अपूर्ण दिवसांची बालके किंवा काही गुंतागुंतीमुळे आईचे दूध अपुरे मिळते आणि अशी अनेक कारणांमुळे बाळाला दुध मिळू शकत नाही अशा परिस्थितीत मातेचे पाश्चराईज केलेले दूध अर्भकाला उपलब्ध करून देणे. सर्वांनाच असे करणे शक्य होत नाही, त्यामुळे तंत्रज्ञाचा आधार घेत सर्वसाधारणपणे, प्रत्येक आईला देवाने अतिरिक्त दुधाची भेट दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे दूध काढणे, त्याची चाचणी घेणे आणि नंतर ते कुपोषित किँवा गरजू अर्भकाला देणे शक्य होते. ह्युमन मिल्क बँक हेच कार्य करते. हे दूध दान करण्यास इच्छुक असलेल्या स्तनदा मातांना एकत्र आणते, ते शास्त्रोक्त पद्धतीने साठवते आणि नंतर ज्यांना त्याची गरज आहे अशा बालकांना दिले जाते.
खर्च गेला वाया
सीएसआर फंडातून खरेदी केलेले हे मशीन अवघ्या पंधरा दिवसांतच खराब झाले. त्यानंतर दुरुस्तीचा प्रयत्न झाला.मात्र यश आले नाही. आता दहा महिन्यांनंतर पुन्हा सीएसआर फंड कुणी देते का? याचा शोध यंत्रणेकडून सुरू आहे. मग अगोदरचे मशीन नवीन घेऊनही ते पंधरा दिवसांतच खराब झाल्याने या मशीनचा खर्च वाया गेल्यात जमा आहे.
लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा
विधानभवनात हिरकणी कक्ष स्थापन करावा म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यापासून तर विधीमंडळाच्या वरिष्ठापर्यंत पाठपुरावा केला. परंतु नाशिकच्या सिव्हिलमध्ये अशी मिल्क बँक गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहे. याबाबत कोणालाच त्याचे सुख दु:ख नाही.
मिल्क बँकेची आवश्यकता असल्याने अत्याधुनिक मशिनरी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या 30 एप्रिलपर्यंत मिल्क बँकेसाठी आवश्यक असे मशीन उपलब्ध होणार आहे.
– डॉ.अशोक थोरात
(जिल्हा शल्य चिकित्सक)
– डॉ.पंकज गजरे, बालरोगतज्ज्ञ (जिल्हा आरोग्य रुग्णालय)
मुख्य मशीन बंद पडले आहे. दुरूस्तीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुरस्ती करण्याऐवजी आता नवीन घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. सीएसआर फंड उपलब्ध झाल्यास मशीन घेता येईल. महानगरपालिका, जिल्हा आरोग्य रुग्णालय, राज्यशासनाच्या मदतीने नवीन मशीन घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.
– प्रफुल्ल बराडिया,
अध्यक्ष रोटरी क्लब ऑङ्ग
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…