नाशिक: प्रतिनिधी
वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांना मान वंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे लष्कराच्या ट्रक मध्ये चढत असताना लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला, चक्कर येऊ लागली, अशा परिस्थतीत त्यांनी जवान बाविस्कर यांच्या पार्थिवाचे अंत्य दर्शन घेतले, त्यानंतर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजप शहर अध्यक्ष सुनील माळी, शेख आखलक यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन उपचार केले त्यानंतर ते नाशिकच्या बैठकीसाठी वाहनाने रवाना झाले.