‘फिरी फिरी नाच’ या खान्देशी गीतावर धरला ठेका
नाशिक ः प्रतिनिधी
नाशिकमधील रंगपंचमीसाठीची रहाड संस्कृती प्रसिद्ध आहे. नाशिककर उत्सवप्रिय असल्याने खास रंगपंचमीला (दि. 8 मार्च) रहाडीत डुंबण्याचा मोह जलसंपदा आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनाही आवरला नाही. शनी चौक परिसरातील पेशवेकालीन रहाडीत त्यांनी धप्पा मारत पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. यावेळी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला. मंत्री महाजन यांच्यासह भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीही हजेरी लावली होती. शहरातील विविध रहाडींत रंग खेळण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती.
जलसंपदा आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील विविध रहाडींवर रंगपंचमीचा आनंद घेतला. सिडको प्रभागातही नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आयोजित केलेल्या वॉटर शोमध्येही ते सहभागी झाले होते. यावेळी महाजन यांनी खान्देशी गीतांवर ठेका धरला होता. तरुणाईने ’फिरी फिरी नाच’ या गीतावर ग्रुप डान्स करत रंगपंचमीचा आनंद लुटला.
संपूर्ण भारतात होळीनंतर दुसर्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते; परंतु नाशिकमध्ये होळीनंतर पाच दिवसांनी येणार्या पंचमीला रंग खेळला जातो. जुने नाशिक, पंचवटी परिसरातील पेशवेकालीन रहाडींची रंगपंचमीला विशेष तयारी केली जाते. शहरात नऊ रहाडी आहेत. रंगपंचमीसाठी तरुणाईसह सर्वच जण उत्साही असतात.
पेशवेकाळापासून चालत आलेल्या रहाड परंपरेला रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्सवाचे स्वरूप येते. शहरातील विविध चौकांमध्ये पुरातन रहाडी खोदल्या जातात. त्याचे पूजन करून त्यात नैसर्गिक रंग भरले जातात. पाणी सोडले जाते. त्यानंतर रंगपंचमीच्या खेळाला सुरुवात होते. यावेळी शालिमार येथेही वॉटर शोचे आयोजन केले होते. यात सहभागी होण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. अनेकांना रहाडीपर्यंत पोहोचणे गर्दीमुळे शक्य झाले नाही. त्यांंनी वॉटर शो, तसेच गोदावरी नदीत रंगपंचमीचा आनंद साजरा केला. यावेळी डीजे, पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईसह आबालवृद्धांनी आनंद लुटला.
Minister Girish Mahajan’s surprise at the Rang Panchami festival!
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…