नाशिक

गौणखनिज वाहतूकदारांचे धाबे दणाणले

निफाडला महसूलची धडक मोहीम; चार वाहनांवर दंडात्मक कारवाई

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक यावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध परिसरात गस्त घालत वाहने तपासली असता, यावेळी खडी व मातीची अवैधरीत्या वाहतूक करणारी चार वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे तालुक्यातील अनधिकृत खनिज वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
अवैध वाहतूक करणार्‍यांवर वचक प्रस्थापित व्हावा, यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान चेतन भंडारी यांचा हाफ बॉडी डंपर (एमएच 15 जेडब्ल्यू 2787) खडीची अवैध वाहतूक करताना आढळला असल्याने सदर वाहन जप्त करून 1 लाख 18 हजार रुपये दंड आकारण्यात आला.
बाळासाहेब चौधरी यांचे वाहन (चेसी नंबर एमएटी 448832318722) (हायवा) मातीची परवानगी नसलेली वाहतूक करताना तपासणीदरम्यान उघड झाले. या वाहनावर 2 लाख 30 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नीरज चोरडिया यांचे वाहन (एमएच 15 केजे 9339, हाफ बॉडी डंपर) विनापरवाना खडी वाहतूक करताना आढळल्याने या वाहनावरही 1 लाख 18 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. अब्बास सय्यद यांचे हाफ बॉडी डंपर (एमएच 05 4322) अवैध खनिज वाहतूक प्रकरणात ताब्यात घेऊन 1 लाख 18 हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासह त्यांच्या पथकाने या कारवाईदरम्यान वाहतुकीची कागदपत्रे, रॉयल्टी पावत्या, परवाने आणि मालाचा तपशील यांची तपासणी केली. नियमबाह्य वाहतूक आढळल्याने संबंधित सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली.
महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खनिज वाहतूक प्रकरणांवर नियंत्रण मिळवणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अवैधरीत्या खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान तर होतेच, पण पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.
कारवाईत सहभागी पथकामध्ये तहसीलदार विशाल नाईकवाडे, जयंत लिलके, मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर केसरे, अश्विनी भोसले, तलाठी अमोल चव्हाण, राहुल अहिरे, दीपक पवार, राहुल भांगरे आदींचा समावेश आहे. महसूल विभागाने पुढील काळातही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तालुक्यात अवैध उत्खनन करणार्‍यांना कोणतीही सूट दिली जाणार नसून, नियमांचे पालन करूनच खनिज वाहतूक
करण्याचे आवाहन प्रशासनाने
केले आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

12 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago