नाशिक

एचपीव्ही लशीबाबत सोशल मीडियावर चुकीचे संदेश

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

नाशिक ः प्रतिनिधी
एचपीव्ही लसीकरण मोहिमेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नियंत्रणासाठी ही मोहीम असून या मोहिमेत 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गार्डसील-4 या एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. परंतु सोशल मीडियावर ही लस घेतल्यास मुली कधीही आई बनू शकणार नाहीत, तसेच इतर आजार होण्याचा धोका आहे, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यात ही मोहीम रविवार 8 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात दि.12 पासून प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात ही मोहीम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ डॉ. कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे.
ही मोहीम पुढील तीन महिन्यांपर्यंत राबविण्यात येणार असून त्यानंतर ही लस नियमित लसीकरण कार्यक्रमासोबत देण्यात येईल. मोहीम यशस्वी होण्याकरिता आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, आदिवासी विभाग व इतर विभागांचे सहकार्य लाभणार आहे. या मोहिमेचे नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.

कोणाला मिळणार लस?

या मोहिमेत 14 वर्षे पूर्ण झालेल्या; परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गार्डसील-4 या एचपीव्ही लशीची 0.5 मिली मात्रा डाव्या दंडातील स्नायूमध्ये दिली जाणार आहे. ही लस जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय येथे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यस्तरावरून एचपीव्ही लस देण्यास दि. 12 पासून सुरुवात होणार आहे. सोशल मीडियावर गैरसमज पसरवले जात आहेत. यासंदर्भात राज्यस्तरावर बैठक झाली आहे. गैरसमज दूर करण्यासाठीचे व्हिडिओ आणि इतर गोष्टींमधून गैरसमज दूर केले जाणार आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये.
– डॉ.सतीश शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

महिलांमधील गर्भाशय मुखाचा कर्करोग ही गंभीर चिंतेची बाब असून तो प्रामुख्याने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. हा असा एकमेव कर्करोग आहे जो लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकतो.

Misinformation on social media about HPV vaccine

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago