राज ठाकरे यांच्या हस्ते ‘मिस्टर बॅचलर’चा शुभारंभ

नाशिक : प्रतिनिधी
मिस्टर बॅचलर या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे करण्यात आला. यावेळी चित्रपट आघाडीचे अमेय खोपकर हे उपस्थित होते.
तीन वर्षांच्या कालखंडानंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा विठ्ठल गोडे यांचे रूपेरी पडद्यावर आगमन होत आहे. त्यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केली आहे. दिग्दर्शनही त्यांचेच आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत हास्य जत्रा फेम आणि संजू या हिंदी चित्रपटात छोटीशी भूमिका साकारणारा गौरव मोरे हा प्रथमच हिंदी चित्रपटात सह अभिनेता म्हणून झळकणार आहे. त्याच्यासोबत टीव्ही कलाकार सानिका काशीकर,मानसी सुभाष, सृष्टी मालवंडे, संकेत कश्यप, सूरज टक्के आदी कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटींग पैठण, पुणे,लडाख, अंदमान निकोबार या ठिकाणी मार्चपासून सुरू होणार आहे. विठ्ठल गोर्डे यांचा मिस्टर बॅचलर हा हिंदी चित्रपट भेटीला येत असल्यामुळे प्रेक्षकांत उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *