नाशिक

आमदार सरोज अहिरे विरुद्ध तहसीलदार अहिरराव वाद पेटणार

सोशल मीडियावरच व्यक्त केली मनातली खदखद

नाशिक: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीला अजून दोन ते तीन वर्षांचा अवधी बाकी असतानाच नाशिकरोड देवळाली मतदार संघात आमदार सरोज अहिरे विरुद्ध तहसीलदार राजश्री अहिरराव वाद पेटला आहे, संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून अहिरराव यांना आतापासूनच सरोज अहिरे या विरोध करत आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरण यांच्या कडे वारंवार तक्रारी करण्यापासून तर थेट विधानसभेत अहिरराव यांच्या बद्दल तक्रार करण्यात आली होती, आता त्यावर कडी म्हणजे अहिरराव या अडीच महिन्यानंतर रजेवरुन परत आल्यावर त्यांना जिल्हाधिकारी गंगा थ रण यांनी हजर करून घेतले नाही, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना भेटून या असा सल्ला अहिरराव यांना दिल्याचे बोलले जाते,
अहिरराव या नाशिकरोड देवळाली मतदार संघ मधून आमदारकी लढवणार आहेत, त्यांची मागील पाच वर्षांपासून तयारी सुरू आहे, त्यामुळे सरोज अहिरे यांच्या कडून सातत्याने अहिरराव यांच्या मार्गात अडथळे आणले जात असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे,
अहिरराव या सातत्याने कार्यक्रमांना हजर राहात असल्याने सरोज अहिरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या, त्यामुळे यापुढे आपण कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही, लोकांनी आपल्याला समजून घ्यावे अशा भावना व्यक्त करणारी पोस्ट अहिरराव यांनी फेसबुकवर केली आहे, या पोस्ट मध्ये अहिरराव यांनी थेट आमदार सरोज अहिरे याच्यावर आरोप केल्याने नागरिक देखील सरोज अहिरे यांच्याबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत,

काय म्हटले आहे पोस्टमध्ये

सप्रेम नमस्कार ,
आपण माझ्यावर माझ्या कामावर अतोनात प्रेम करतात त्या बद्दल आपले शतशः ऋणी आहे 🙏
, नाशिक तालुका निवासी नायब तहसीलदार (२००९-२०१३) व नाशिक तालुका तहसीलदार (२०१५-२०१८)म्हणुन काम करित असताना आपल्या सगळ्यांसोबत ऋणानुबंध जुळले , आपण खुप प्रेम दिले , मी तुमच्या घरातील सदस्य झाली .
कदाचित अधिकारी म्हणुन काम करित असताना इतक प्रेम सहकार्य व काम करायची संधी इतरांना क्वचितच मिळाली असावी , बदली झाल्यानंतर प्रत्येक गावातून बदली रद्द होणे बाबत मागणी झाली , तालुक्यातील सगळ्या पदाधिकार्यांनी थेट मुंबई गाठली हा प्रसंग मी कधीही विसरु शकत नाही
मला आपण सगळे विविध कार्यक्रमांचे प्रेमाने आमंत्रण देतात व प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थीत रहावे असा आग्रह असतो मी देखील प्रत्येक कार्यक्रमाला ॲाफीस वेळे व्यतिरिक्त उर्वरीत वेळेत जसे जमेल तसे सुखदुःखात उपस्थीत राहण्याचा प्रयत्न करते परंतु गेले दिड दोन वर्षापासुन आमदार मॅडम मी कार्यक्रमांना उपस्थीत राहु नये म्हणुन जिल्हाधिकारी महोदयांकडे वारंवार तक्रार करीत आहेत
खर तर सार्वजनिक जीवनात आपण कोणत्याही कार्यक्रमांना हजर राहु शकतो तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्विस रुल मध्ये देखील खाजगी कार्यक्रमांना जाऊ नये असे कुठेही नमुद नाही .

परंतु आमदार महोदया मी कार्यक्रमांना उपस्थीत राहु नये या बाबत जिल्हाधिकारी महोदयांना सांगतात अन्यथा पुढील फेब्रुवारीच्या अधिवेशनात पुन्हा प्रश्न उपस्थीत करेन .
हिवाळी अधिवेशनात विधान भवनात देखील माझा काहीही संबंध नसताना माझ्या पदाचा उल्लेख करुन तक्रार केली
वास्तवीक पहाता मी गेले २८ वर्षे आरोग्या विभागात वैद्यकीय अधिकारी व महसुल अधिकारी आहे .मला माझे अधिकार व कर्तव्यांची जाण आहे व त्या प्रमाणेच मी आजपर्यंत काम करित आहे .मी कधीही कुणाच्या कामात ढवळाढवळ करीत नाही , मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे , जमेल तशी आपल्या सगळ्यांची मदत सेवा करीत असते .
हा सगळा लेखा जोखा मांडण्याचा अट्टाहास या साठी की मी सध्या आपण आमंत्रीत केलेल्या कार्यक्रमांना वरील कारणास्तव उपस्थीत राहु शकत नाही या बद्दल मी आपणा सगळ्यांची माफी मागते . मी कार्यक्रमांना येत नाही या बद्दल कृपया गैरसमज करुन घेऊ नये आपण मला समज़ावुन घ्याल व असेच प्रेम आपुलकी आशिर्वादाची छत्रछाया माझ्यावर नेहमी असु द्या ,
पुनःश्च आपले शतशः ऋणी

डॅा . राजश्री अहिरराव , तहसीलदार , जि का नाशिक

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

16 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

16 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

16 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

17 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

17 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

17 hours ago