नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने भद्रकाली परिसरात एकच गर्दी झाली होती.
आमदार फरांदे यांनी भद्रकाली पोलीस स्टेशन जवळील मतदान केंद्रा च्या आसपास भेट देत परिस्थिती जाणून घेत परिसरातील नागरिकांशी संवाद साधला
भेटी दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दी झाल्याने पोलिसांनी आणि कमांडो यांनी जमाव पांगवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी नाशिक मध्ये उमेदवार वसंत गिते यांची ही गाडी पाठोपाठ आल्याने काही युवकांनी घोषणाबाजी केली. भद्रकाली पोलीस स्टेशनचे पीआय तसेच इतर सहकारी आणि कमांडो यांनी आमदार फरांदे यांना पुढे मार्ग काढण्यास सांगितला त्यानुसार त्यांनी पायी जात नागरिकांना भेट दिली त्यानंतर त्यांचे वाहन आल्यानंतर त्या तेथून निघून गेल्या. मागोमाग वसंत गीते यांची ही गाडी आली आणि गीते मात्र वाहनातून न उतरता सरळ मतदान केंद्रांकडे निघून गेले.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…
नाशिक: प्रतिनिधी दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून…