आमदार सुहास कांदे मराठा आरक्षणाचे मारेकरी
अखिल भारतीय मराठा महासंघाचे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल…!
मनमाड : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे करत असुन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी जे अडथळे आहेत या आरक्षणाच्या अनेक मारेकऱ्यांमध्ये सध्या सत्तेत असलेले विद्यमान आमदार सुहास कांदे हेही आहेत असा गौप्यस्फोट अखिल भारतीय मराठा महासंघाचे नांदगाव तालुका प्रमुख भीमराज लोखंडे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले असुन आज सायंकाळीच आमदार कांदे यांनी उद्या होणाऱ्या आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी व्हिडीओ क्लिप द्वारे आव्हान केले होते मात्र तात्काळ काही वेळातच हे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या देशातील प्रमुख मुद्दा झाला आहे संघर्षयोद्धा मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ नांदगाव तालुक्यातील मराठा बांधव देखील बसले आहेत उद्या त्यांच्या समर्थनार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात सहभागी होण्यासाठी मी येतोय तुम्हीही या असा व्हिडीओ आमदार सुहास कांदे यांच्यामार्फत व्हायरल करण्यात आला मात्र कोल्हापूर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे मात्र ओबीसी आरक्षणला धक्का लावू नये असा ठराव आमदार कांदे यांनी मांडला यामुळे त्यांची भूमिका ही दुटप्पी आहे असा आरोप तेव्हाच मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला मात्र राजकारण करू नका अस म्हणत वेळ मारून नेली होती आज मात्र अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मारेकरी मध्ये आमदार सुहास कांदे हेही आहेत असे पत्रक काढण्यात आले या पत्रकावर तालुका प्रमुख भीमराज लोखंडे विशाल वडघुले भास्कर झालटे विष्णू चव्हाण प्रकाश जगताप आदींच्या सह्या आहेत.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…