राजगडच्या वर्धापनदिनी मनसैनिकांशी साधणार संवाद
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते बाळा नांदगांवकर शनिवारी ( दि . २ ) राजगड कार्यालयाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथे सायंकाळी ५ ते ९ दरम्यान राजगड कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व नवीन व जुने पदाधिकारी व मनसैनिकांबरोबर संवाद साधणार आहेत . त्यानिमित्त शुक्रवारी ( दि . १ ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी , नगरसेवक , शहर समन्वयक , शहरातील उपजिल्हाध्यक्ष , शहर उपाध्यक्ष , सरचिटणीस , सर्व अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी , सर्व इच्छुक उमेदवारांची अति महत्वाची व तातडीची बैठक राजगड येथे झाली . राज्यातील सत्तानाट्यानंतर स्थापन होत असलेल्या नवीन सरकारच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगांवकर दौऱ्यास विशेष महत्व प्राप्त झाले असून नांदगांवकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापनेपासुनचे सर्व नवीन व जुने पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांबरोबर शनिवार कार्यालयात संवाद साधणार आहेत . यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते नांदगांवकर , अनिल शिदोर व सरचिटणीस संजय नाईक यांची नाशिकसाठी संपर्क म्हणून नेमणूक मह केल्यानंतर बाळा नांदगांवकर यांचा प्रथमच नाशिक दौरा होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे शहर समन्वयक सचिन भोसले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : राज ठाकरे यांची तोफ धडाडणार!
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…