अफवा बेतू शकते जीवावर
नाशिक, मुले पळवनाऱ्या टोळी चा नाशिकमध्ये सुळसुळाट झाला असल्याच्या अफ़वा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत,या अफवांमुळे विनाकारण निष्पाप लोकांना मारहाण केल्याचे प्रकार घडत आहेत, यातून मॉम लिंचींग सारखे प्रकार घडण्याचा धोका वाढला आहे, यातूनच विनाकारण कुणाचा जीव देखील जाऊ शकतो, त्यामुळे अफवा पसरवणे बंद करा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार आहे,
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अफ़वा पसरवून नागरिकात घबराट पसरवून दहशत निर्माण केली जात आहे, गंजमाल आणि काल वडाळा भागात या अफवातूनच मारहाण करण्यात आली, पोलीस आल्या मुळे नागरिकांच्या तावडीतून संबंधीची सुटका झाली, पालघर येथे कोरोना काळात एका साधूची आशा खोट्या अफवातूनच बळी गेला होता, त्यामुळे पोलिसांनीच आता यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे, अफवा पासर्वाणार्या बरोबरच निष्पाप लोकांना मारहाण करणाऱ्या वर कारवाई केल्यास अशा प्रकरणाना आळा बसू शकेल,
पोलीस अधीक्षक पाटील यांचे आवाहन
नाशिक जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची मुलांना पळवनारी टोळी कार्यरत नाही, त्यामुळे कोणी तरी अफवा पसरवून जनतेत घबराट निर्माण करीत आहेत, अशा प्रकारच्या अफवा कोणी देखील पसरु नये, आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे
अधीक्षक पाटील यांचे आवाहन