तुमच्याही मोबाइलवर आला का असा मेसेज?

तुमच्याही मोबाइलवर आला का असा मेसेज?

नाशिक: प्रतिनिधी
आज सकाळपासूनच कुणालाही फोन लावला की एक सिक्युरिटी अलर्ट असा मेसेज सर्वांच्या मोबाईलवर येत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे, मात्र हा एक टेली कम्युनिकेशनचा सर्व्हे आहे, आपत्कालीन परिस्थिती उदभवली तर मदत मागवता येईल का याबाबतचा आढावा घेतला जात आहे.

DOT च्या अंतर्गत दूरसंचार विभागातर्फे काही अलर्ट टेस्ट केल्या जात आहेत. या अलर्ट चा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रकारे होईल यासाठी या टेस्ट केल्या जातात. अनेक देशांमध्ये अनेकवेळा अशा टेस्ट केल्या जातात. यातून लोकांनी घाबरून जाऊ नये. हे अलर्ट मोबाईल सेटिंग मधून ऑफ करता येऊ शकतात.

– ओंकार गंधे (सायबर सुरक्षा तज्ज्ञ)

 

दूरसंचार विभाग, भारत सरकारच्या वतीने एक तपासणी मेसेज तुमचा नंबर वरती पाठवण्यात आला आहे.
या मेसेजला पॉपअप मेसेज असं म्हणतात.
डॉ. तन्मय दीक्षित
सायबर तज्ञ, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *