format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:136; brp_del_th:0.0033,0.0000; brp_del_sen:0.3000,0.0100; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 281.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;
दै. गांवकरीच्या मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या धामधुमीत मंगलमय वातावरणात दै. गांवकरी व मयूर अलंकार आणि वायटॅलिस होमिओपॅथिक क्लिनिक व लायन्स क्लब पंचवटी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित ‘चांदीचा मोदक जिंका’ स्पर्धा गांवकरी भवनात काल गुरुवारी रंगल्या. गोकर्णाच्या फुलांपासून तर ड्रॅगन फ्रूटचा समावेश असलेले विविध प्रकारचे व विविध स्वादाचे नावीन्यपूर्ण मोदक महिलांनी बनवून आणत सादर केले. परीक्षकांसह उपस्थितांची या मोदकांच्या पाककृतींना भरभरून दाद मिळाली.
भाग्यवान तीन विजेत्या महिलांना चांदीचा मोदक व चार विजेत्यांना चांदीच्या दूर्वा बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या. तसेच सहभागी सर्व स्पर्धक महिलांना यावेळी आकर्षक गिफ्ट देण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मयूर अलंकारचे संचालक राजेंद्र शहाणे, वैद्य विक्रांत जाधव, वायटॅलिस होमिओपॅथिक क्लिनिकच्या डॉ. श्रेया राठी, अरविंद राठी, जयश्री राठी, स्पर्धेच्या परीक्षक व अॅम्रो कॉलेजच्या संचालिका सुनंदा सोनी, सिक्का क्लब ट्रेनिंग सेंटर ऑफ आर्टच्या ग्रीष्मा लोखंडवाला, लेखिका मृणाल पाटील, अॅड. प्रतीक्षा चौधरी, एएचए हॉटेल मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक माणकेश्वर राम, दै. गांवकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, जाहिरात व्यवस्थापक अनिरुद्ध पांडे उपस्थित होते. मोदक स्पर्धेत शंभराहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक अश्विनी पांडे यांनी केले. आभार उपसंपादक मुकुंद बाविस्कर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसंपादक गोरख काळे, देवयानी सोनार, राजेंद्र खुळे, वाहिद बागवान, नयना बारिया, अफजल पठाण, समाधान रोकडे, गजानन वैद्य, संदीप भांगरे यांनी परिश्रम घेतले.
भाग्यवान विजेत्या
या स्पर्धेेत प्रथम क्रमांक श्रुती मेखे, द्वितीय क्रमांक खुशी मोरे, तृतीय क्रमांक मीनल गुरव या चांदीच्या मोदकाच्या मानकरी ठरल्या, तर उत्तेजनार्थ बक्षीस संगीता खैरनार, मोनाली हारदे, आशा बोरोडे, माया गुंजाळ यांना मिळाले.
मोदकाच्या विविध रेसिपी
शुगर फ्री उपवासाचे शाही पनीर मोदक, गोकर्णिच्या फुलांचा उकडीचा मोदक, माणिक मोती मोदक, श्रीखंडबेरी मोदक, नागलीच्या पीठाचे व कोरफडीचे औषधी मोदक, नाचणी मोदक, रताळे उकडीचे मोदक, खरवस मोदक, रोझ फ्लेव्हर्ड मोदक, अडुळसा आयुर्वेदिक मोदक, पान मसाला मोदक, पौष्टिक मोदक, उकडीचे मोदक, बीट उकड मोदक, तिरंगा मोदक, शुगर फ्री दुधी भोपळा मोदक, चॉकलेट ड्रायफ्रूट मोदक, बेसन बर्फी मोदक, रोझ कोकोनेट मोदक, मिक्स फ्रूट चॉकलेट मोदक.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…