नाशिक : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपोवन येथील मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सव चे उदघाटन करून उपस्थितांना संबोधित करणार आहे. दरम्यान मोदी येणार असल्याने तपोवन मैदानावर सकाळी दहा वाजेपासून सर्व मैदान खाचाखच भरले. तरुणाई सह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सभा स्थळी जय श्री राम, भारत माता कीं जय, मोदी मोदी घोषणानी परिसर दणाणून सोडला. प्रचंड उत्साह उपस्थित तरुनामध्ये आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातून भाजपचे कार्यकर्ते आले आहे.