दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट का घेतली याचा खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, यासंदर्भात आपण पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. संजय राऊत यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्याची घटना घडली. यासंदर्भातही आपण मोदी यांच्याशी बोलल्याचे शरद पवार म्हणाले. शरद पवार आणि मोदी यांची भेट दिल्लीत काल दुपारी झाली. मात्र, त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात होते. परंतु या चर्चांना खुद्द शरद पवार यांनीच पूर्ण विराम दिला.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…