नाशिक

मोदींच्या दौर्‍याने भाजपाला लोकसभेसाठी बुस्ट

 

नाशिक :अश्विनी पांडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा भारतीय जनता पार्टीसाठी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने बुस्ट ठरत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या दोन ते तीन महिन्यावर आल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघावर सर्व पक्षांचा डोळा आहे.त्यामुळे सर्वांकडून लोकसभेच्या जागेसाठी दावेदारी करण्यात येत आहे.गेल्या पंचवार्षिकमध्ये नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे होती तर विरोधात राष्ट्रवादीने ही जागा लढली होती .त्यामुळे राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना झालेल्या सामन्यात शिवसेनेने नाशिक लोकसभेवर आपला झेंडा फडकवला . मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे.   विरोधात असणारे पक्ष आता महाआघाडी आणि महायुतीत एकत्र नांदत आहेत. 

 नाशिकमध्ये विद्यमान खासदार असलेल्या महायुतीतील शिवसेनेकडून ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी मतदार संघात चमकदार कामगिरी केली नसल्याचा मतदारांचा सुर आहे. सध्यातरी लोकसभा निवडणुकीसाठी  महाआघाडीकडून ही जागा कोणाला मिळणार याबाबत चित्र स्पष्ट नाही. हीच संधी साधत महायुतीतील भाजपानेही नाशिक  लोकसभेसाठी कंबर कसली आहे .   त्यातच नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार आणि गेल्या महानगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत  भाजपाची सत्ता असल्याने नाशिक लोकसभा भाजपाला मिळाल्यास या जागेवर भाजपाचा खासदार होऊ शकतो असा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सुर आहे.

 भाजपमधील लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांनी तीन वर्षापासुन लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरूवात केली आहे. विशेष करून ही तयारी वरिष्ठांच्या आदेशानुसार सुरू असल्याचे दिनकर पाटील यांच्याकडून सांगण्यात येते .  त्यामुळे  भाजपानेही नाशिक लोकसभा निवडणुक लढवण्याची आपली मनिषा लपवलेली नाही . राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नाशिक दौऱ्यावर येत असल्याने भाजपाला नाशिक  लोकसभा निवडणुकीसाठी चांगलाच बुस्ट मिळाला आहे. 

हेही वाचा : दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्याने 18 ग्रामपंचायतींना सव्वा कोटींचा निधी

विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विषयी गेल्या दहा वर्षात मतदार संघात अपेक्षित  कामगिरी न केल्यामुळे असलेली नाराजी आणि  भाजपाचे नेते व माजी सभागृह  नेते दिनकर पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली जोरदार तयारी यामुळे  भाजपासाठी पोषक वातावरण तयार होतांना दिसत आहेत..

पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यामुळे  शहरातील वातावरण मोदीमय झाले आहे.याचा भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निश्चितच फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.त्यामुळे सध्या तरी नाशिक लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यातील सत्ताधारी असलेल्या  महायुतीतील दोन्ही पक्षांनी नाशिक लोकसभेवर दावा केला असला तरी  प्रत्यक्ष निवडणुक लागल्यावरच  ही जागा कोणाच्या वाट्याला येईल हे कळणार आहे. मात्र सध्या तरी नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आणि   भाजपातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक  असलेल्या दिनकर पाटील यांची जोरदार तयारी पाहता नाशिक लोकसभेसाठी भाजपाचे पारडे जड दिसत आहे.

 

धुळे शिंदे गटाला, नाशिक भाजपला?

नाशिक ही मंत्रभूमी आहे, कुंभनगरी असल्याने भाजपाने नाशिककडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नाशिकमध्ये सद्या शिंदे गटाचा खासदार आहे.पण भाजपला नाशिक हवे असल्याने धुळे शिंदे गटाला देऊन त्याबदल्यात नाशिक भाजपकडे घेण्याचे सूत्र ठरले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भाजपला ही जागा सुटल्यास प्रबळ उमेदवार म्हणून दिनकर पाटील यांची दावेदारी पक्की मानली जात आहे.

 

 

हेही वाचा : पालिका शाळेतील विद्यार्थ्याना तात्काळ गणवेश मिळावा

Ashvini Pande

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

1 day ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

1 day ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

1 day ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

1 day ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

1 day ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

1 day ago