सिन्नर :
नाशिकहून कोल्हापुरकडे निघालेली खासगी लक्झरी बस मोहदरी घाटात (दि.13) रात्री 9.40 च्या सुमारास अचानक पेटली, तथापि चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरविल्याने जीवीत हानी टळली. सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या आग्नीशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझविली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, श्रीहरी दत्तात्रय कुलकर्णी, रा. म्हसरुळ, नाशिक हे खासगी लक्झरी बस (क्र. एमएच 09, पी.बी. 3069) नाशिकहून कोल्हापुरकडे भाविकांना घेऊन जात होते. बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवाशी होते. नाशिकहून निघालेली बस रात्री 9.40 च्या सुमारास मोहदरी घाटात आली असता, बसला आग लागल्याचे चालक कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले. प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर आल्यानंतर कुलकर्णी यांनी सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या आग्नीशामक दलाला तसेच एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोन्ही आग्नीशामक बंब तात्काळ घटनास्थळी पोहचले व काही वेळात आग विझविण्यात आली. चालक कुलकर्णी यांनी प्रसंगावधान दाखविल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बचावले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांना आगी लागण्याच्या घटना तालुक्यात घडत आहेत. गेल्या महिन्यात पांढुर्ली घाटात धावत्या चारचाकीला आग लागून चालकाचा मृत्यू झाला होता. दुसर्याच दिवशी नांदूरशिंगोटे रस्त्यावर चारचाकीने् पेट घेऊन आगीत भस्मसात झाली होती. एप्रिल महिन्याच्या शेवटी मोहदरी घाटात कार पेटण्याची तसेच सोमवारी गुरेवाडी शिवारात दुचाकीने पेट घेतल्याने देशवंडी येथील तरुणाचा मृत्यू झाला तर काल खासगी लक्झरी बस पेटली मात्र चालकाच्या प्रसंगावधनाने प्रवाशांचा जीव वाचला.
बर्निंग बसचा व्हिडिओ
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…