मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

15 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोखाडा : नामदेव ठोंमरे

मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि 21/07/2025 रोजी रात्री गस्तीवर असलेल्या पथकाला रात्रौ 2 वाजेच्या दरम्यान मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवर क्रेटा कार क्रमांक MP09CZ6669 ही कार भरधाव वेगाने जात असताना आढळून आली.त्यामूळे पोलिस अंमलदार बापू नागरे यांना संशय आल्याने पोलिस हवालदार शशीकांत भोये आणि पोलिस अंमलदार बापू नागरे यांनी सदर कारचा पाठलाग केला असता मौजे चिंचूतारा गावाच्या शिवारात सदर कारचा चालक हा अंधाराचा फायदा घेऊन गाडीची चावी घेवून पसार झाला होता.कारची तपासणी केली असता त्यात अफूचे पोते भरलेले आढळून आले आहेत.पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सक्त आदेश संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना व स्थानिक गु्न्हे शाखेला दिले आहेत.त्याचा परिपाक म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे.

सदर कारची तपासणी केली असता त्यामध्ये 7 लाख 80 हजार 340 रुपये किमतीचा 1 क्विंटल 11 किलो 420 ग्रॅम वजनाचा अफूच्या बोंडाचा चुरा व HR36AC2410,MH05DS2526 क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेट आणि 8 लाख रुपये किंमतीची क्रेटा कार असा एकूण 15 लाख 80 हजार 340 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत मोखाडा पोलिस ठाण्यात गुरनं 119/2025 ,एनडीपी कायदा 1985 चे कलम 15
( क ) व 8 (क ),मोवाका कलम 184 प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले करत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक यतीश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे, पोलिस हवालदार भास्कर कोठारी, पोलिस हवालदार शशीकांत भोये, पोलिस अंमलदार पंकज गुजर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *