नाशिक : प्रतिनिधी
मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावातून आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.गेल्या काही महिन्यात देशभरातील करोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात आला आहे. असे असताना आता मंकीपॉक्सया संसर्गजन्य आजाराने जगभारत थैमान घातले आहे.
मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तर महाराष्ट्र सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावर सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. मंकीपॉक्स हा रोग माकडांमध्ये आढळून येतो. मनुष्यामध्ये मंकीपॉक्सची केस 1970 मध्ये आफ्रिकेत
आढळली होती.
मात्र सध्या सर्वाधिक रूग्ण पोर्तगालमध्ये सापडत आहेत. आतापर्यंत 12 देशात मंकीपॉक्सचे रूग्ण आढळले आहेत. भारतात सुदैवाने अजून या विषाणूने बाधित अजून एकही रूग्ण आढलेला नाही. या विषाणूचा प्रसार उंदीर, खार, उंदराचे मांस यापासून
प्रसार होतो.
मंकीपॉक्सची लक्षणे
मंकीपॉक्समध्ये आपली त्वचा लाल पडते., त्वचेवर लाल रंगाचर फोड येतात., त्वचेला खाज सुटते., डोके दुखी, स्नायूमध्ये वेदना, थंडी वाजणे, थकवा येणे, ताप येणे. ही लक्षणे आढळतात. मंकीपॉक्समध्ये चेहर्यावर मुरूमासारखी मोठी फोड येतात. मानेवर गोवरसारखी बारीक पुरळ .
ही घ्या काळजी
मंकीपॉक्स हा आजार संसर्गजन्य असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापरणे करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. तसेच लक्षणे आढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…