493 परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार(दि.20)पासून सुरुवात होणार आहे. नाशिक विभागात 2 लाख 6 हजार 611, तर नाशिक जिल्ह्यात 96 हजार 634 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत या परीक्षा होणार असून, पहिला पेपर मराठीचा आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेत पेपर होणार आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी बोर्ड प्रशासनाने तयारी केली आहे. परीक्षा खोलीत सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणार्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेसाठी नाशिक विभागातून एकूण 2 लाख 6 हजार 611 नियमित विद्यार्थी नोंदणीकृत झाले आहेत.
नियमित विद्यार्थ्यांमध्ये 1 लाख 12 हजार 845 मुले व 93 हजार 766 मुली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील 96 हजार 634 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातून 59 हजार 478, धुळे जिल्ह्यातून 29 हजार 246, तर नंदुरबार जिल्ह्यातून 21 हजार 253 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
याशिवाय, नाशिक विभागातून एकूण 1 हजार 537 खासगी विद्यार्थी परीक्षेला बसणार असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील 1 हजार 43, जळगाव 273, नंदुरबार 115 आणि धुळे जिल्ह्यातील 106 विद्यार्थी आहेत.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, विभागातून एकूण 422 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नाशिक 168, धुळे 143, जळगाव 84 व नंदुरबार 27 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परीक्षेच्या आयोजनासाठी नाशिक विभागात एकूण 493 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, 60 पर्यवेक्षकांची (परिरक्षक) नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 224 केंद्रे, जळगाव 147, धुळे 72 व नंदुरबारमध्ये 50 केंद्रांचा समावेश आहे.
परीक्षा सुरळीत, पारदर्शक व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मंडळाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती विभागीय मंडळाकडून देण्यात आली आहे.
नाशिक 96,634
धुळे 29,246
जळगाव 59,478
नंदुरबार 21,253
एकूण 2,06,611
More than 2 lakh 6 thousand students in Nashik division
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…