महाराष्ट्र

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात 35 हजाराहून अधिक पक्षांचा किलबिलाट

नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे वनविभागाचे आवाहन
चार हजारहून अधिक पर्यटकांची भेट
नाशिक ः प्रतिनिधी
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात स्थलांतरीत देशी विदेशी पक्षी तसेच स्थानिक पक्षांनी परिसर गजबजला आहे.आतापर्यंत35 हजाराहून अधिक पक्षांची नोंद करण्यात आली आहे.सध्या संक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा केला जात आहे.पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्याने पक्षांना हानी पोहचते.पक्षी राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे जतन करणे सर्वांची जबाबदारी आहे.त्यामुळे सामाजिक भान जपत सण साजरे करावेत असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात शनिवार रविवार विकेंडला पर्यटकांची गर्दी होत असून आतापर्यंत चारहजारहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.

 

 

 

 

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याला राज्यातील पहिले रामसर स्थळ आहे. वातावरणीय बदलांमुळे विकसित झालेले कुरण जैवविविधतेसाठी पोषक आहे.त्यामुळे अशा वातवरणात प्लेमिंगो पक्षांना आकर्षण करणारी आहे.हिवाळयात स्थलांतराच्या हंगामात नांदूरमध्यमेश्वरची पाणी पातळी अधिक असल्याने चार सहा प्लेमिंगो दोनचार दिवस मुक्कामी राहिले होते.अधिक पाऊस आणि वातावरणीय बदला नंतर प्लेमिंगोनी पुन्हा आपला मोर्चा अभयारण्याकडे वळविला होता.

 

 

 

या अभयारण्यात दरवर्षी देश विदेशातील विविध पक्षांचे आगमन होत असते.उत्तर अमेरिका,युरोप,सायबेरीया,आशियायी देश आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने पक्षांचे स्थलांतर दरवर्षी होत असतेर्. थंडीस सुरूवात झाल्यावर अन्नाच्या शोधार्थ नांदूरमध्यमेश्वर येथे येतात.वारकरी जांभळा बगळा,राखी बगळा,प्रॅटिन्कोल,कमळपक्षी,,शेकाट्या,नदी सुरय,उघड्या चोचीचा बगळा आदी स्थलांतरी पक्षांसह विदेशी पक्षी आढळून येत आहेत.वन्यजीव विभागाकडून नुकतेच चापडगाव,मांजरगाव,खानगावथडी,मध्यमेश्वर गोदावरी पात्र,कोठूरे,कुरूडगाव,काथरगाव,आदी सात केंद्रांवर पक्षी निरिक्षण करण्यात आले.

 

 

त्यामध्ये 55 हजार प्रजातींचे पाण पक्षी आणि गवताळ भागातील पक्षी असे एकूण 35 हजाराहून अधिक पक्षांची नोंद करण्यात आली.देशी विदेशी पक्षांचे आगमन झाल्याने नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पर्यटकंाची संख्या वाढली असून चार हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.विशेषतः विकेंडला पर्यटकांची गर्दी होत असल्याचे वनअधिकार्‍यांनी माहिती दिली.

 

 

 

वनविभागाचे नायलॉन मांजा न वापरण्याबाबत आवाहन
2017 पासून राष्ट्रीय हरित लवाद (एन.जी.टी)ने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे.नायलॉन मांजा वापरल्याने पक्ष्यांना इजा होते त्याचप्रमाणे पक्षी ही राष्ट्रीय संपत्ती आहे व त्याचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सामाजिक भान ठेवून सण साजरे व्हावे असे आवाहन वन्यजीव नाशिकच्या विभागाच्या वतीने करण्यात आले

 

 

 

 

सध्या खूप चांगली पक्षी संख्या असल्याने जास्तीत जास्त पर्यटकांनी आणि पक्षीनिरीक्षकांनी याचा लाभ घ्यावा,
शेखर देवकर (वनपरिक्षेत्र अधिकारी,नांदूरमध्यमेश्वर)

 

 

 

Devyani Sonar

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

17 hours ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

17 hours ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

17 hours ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

17 hours ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

17 hours ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

18 hours ago