सिडको : विशेष प्रतिनिधी
देवळाली कॅम्प परिसरातील आडकेनगर येथे नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून वैतागलेल्या सुनेने वयोवृद्ध सासूचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
सकिना गफार शेख (वय 89) असे मृत महिलेचे नाव असून, शबाना अब्दुल अजीज शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपी सुनेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते पावणेतीन वाजेच्या सुमारास साईदर्शन अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये घडली. मयत सकिना शेख या त्यांची सून शबाना हिच्यासोबत राहत होत्या. घटनेच्या दिवशी मयत सकिनांच्या दीर रौफ यांनी शबानाला सासूसाठी पान आणण्यास सांगितले. मात्र, सततच्या आजारपणामुळे त्रस्त झालेल्या आणि सासूच्या कुरकुरीला कंटाळलेल्या शबानाने पान आणण्यास नकार दिला. यावरून दोघींमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान भांडणात झाले आणि संतप्त अवस्थेत शबानाने सकिना यांचा गळा दाबला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 3 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलीस हवालदार आशिष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. आरोपी शबाना शेख हिला अटक करण्यात आली आहे. केवळ एका पानासाठी आणि आजारपणाच्या वैतागातून सासूचा जीव घेणार्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एका क्षणाच्या रागामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहेत.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…