दाभाडीत जन्मदात्या मुलांनी घोटला आईचा गळा

 

 

 

दोघं मुले छावणी पोलिसांच्या ताब्यात; दोन दिवसांची पोलीस कोठडी

 

 

मालेगाव: प्रतिनिधी

 

 

मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात आई व मुलाच्या पवित्र नात्याला कलंकीत करणारी घडली आहे.काैटूंबिक वादातून दाेघा पाेटच्या मुलांनी आपल्या जन्मदात्या आईचा गळा आवळून खून केला. हा दुर्दैवी प्रकार दाभाडीच्या गिसाका काॅलनीत साेमवारी सकाळी घडला. सुलकनबाई किसन साेनवणे (७९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दाेघा मुलांना छावणी पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलकनबाई या माेठा मुलगा भगवान किसन साेनवणे (४५) व लहान मुलगा संदीप किसन साेनवणे (४२) यांच्यासाेबत रहात हाेत्या. पैशांच्या कारणावरुन दाेन्ही मुले त्यांच्याशी नेहमीच वाद घालत हाेते. याच वादातून भगवान व संदीप यांनी सुलकनबाई यांचा नायलाॅन दाेरीने गळा आवळून खून केला. प्रारंभी दाेघांनी सुलकनबाईने आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, पाेलिसांना मुलांच्या कारनाम्याची भनक लागल्याने त्यांनी घटनेची सखाेल चाैकशी केली. यात दाेघांनी दाेरीने गळा घाेटून मारल्याची कबुली दिली. सुलकनबाई याचे पती गिसाका कारखान्यात वाॅचमन हाेते. पतीच्या मृत्यूनंतर सुलकनबाई यांनी मुलांचा सांभाळ केला हाेता. पतीला मिळालेल्या पैशांतून कुटूंबाचा उदनिर्वाह करत हाेत्या. याच पैशाची सातत्याने मागणी करुन मुले त्यांच्याशी वाद घालत असल्याचे समाेर आले आहे. घटनेनंतर अपर पाेलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट देत तपासकामी सूचना केल्या. याप्रकरणी राहूल हिरे यांच्या फिर्यादीवरुन छावणी पाेलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *