पळाशी वार्ताहर:-
नांदगांव तालुक्यातील साकोरा येथील एका मोटारसायकलस्वाराचा सारताळे येथे जात असताना साकोरे नजीकच्या असणार्या पेट्रोल पंपासमोर पाइप टाकण्यासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात मोटारसायकलसह पडल्याने डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला.
नांदगाव-वेहेळगाव नव्याने होत असलेल्या रस्त्यावर साकोरे नजीकच्या संतोष बोरसे यांच्या पेट्रोल पंपासमोरील होत असलेल्या रस्त्यावर पाणी होऊन जाण्यासाठी पाईप टाकण्यासाठी खड्डे खोदलेले आहेत. एका बाजूने पाइप टाकण्याचे काम केले आहे दुसरी बाजूला पाइप टाकण्यासाठी खड्डे खोदलेले आहे. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरण शिवाजी छत्रे (रा. साकोरा, ता. नांदगाव) यांचा मोटारसायकलसह खड्ड्यात पडल्याने डोक्यास गंभीर मार लागून जागीच ठार झाला. शेतकरी कुटुंबातील किरण आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. किरणच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.