मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी मोहन यादव

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी मोहन यादव
भोपाळ :  मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याबाबतच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर जगदिश देवरा आणि राजेंद्र शुक्ला हे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
मध्यप्रदेशमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कुणाची निवड होते? याकडे लक्ष लागून होते. भाजपाने निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. शिवराजसिंह चौहान हे चार वेळा मुख्यमंत्री राहिल्यामुळे यावेळी त्यांची निवड होणार नाही, याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. ती अखेर खरी ठरली. भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत शिवराज सिंह यांना विश्रांती देत नवा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी दिला आहे. मोहन यादव हे उज्जैनमधून निवडून आले आहेत. मुख्यमंत्रीपदाची निवड करण्यासाठी पक्षनिरीक्षक म्हणून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. लक्ष्मण, आशा लाका यांच्या ुउपस्थितीत विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाची घोेषणा करण्यात आली. मोहन यादव हे दक्षिण उज्जैनचे आमदार आहेत. शिवराजसिंह यांच्या मंत्रिमंडळात ते शिक्षणमंत्री होते. मोहन यादव हे संघाच्या अतिशय जवळचे समजले जातात.विद्यार्थी परिषदेतही त्यांनी काम केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *