महाराष्ट्र

पोलीस अकादमीत दीक्षांत समारंभ

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 119 व्या सत्राचा दीक्षांत संचलन, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळा अशा विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन तर उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 119 व्या सत्राचा दीक्षांत संचालनाचा कार्यक्रम आज सकाळी 8 वाजता पोलीस अकादमीतील मुख्य  कवायत मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृह राज्यमंत्री शहरे सतेज पाटील, गृह राज्यमंत्री ग्रामीण शंभुराज देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन
तसेच यानंतर सकाळी 9:45 वाजता गुन्हे अन्वयेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृह राज्यमंत्री शहरे सतेज पाटील, गृह राज्यमंत्री ग्रामीण शंभुराज देसाई, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालिका अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मातोश्री मुलींच्या वसतीगृहाचे लोकार्पण
त्यानंतर सकाळी 11:00 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेअंतर्गत मातोश्री मुलींच्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ,  कृषी मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

8 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago