खासदार आले आणि गेले शहराध्यक्ष यांनाही नाही कळाले

खासदार आले आणि गेले शहराध्यक्षला सुद्धा नाही कळाले…?
मनमाड : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले भास्कर भगरे सर हे निवडून आले आणि ज्या अपेक्षेने जनतेने त्यांना निवडून दिले ते कामही त्यांनी हाती घेतले असुन अनेक ठिकाणी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते आवर्जून पोहोचले आहे मात्र खासदार आले आणि मनमाड शहरातून पुढे मांडवड या भागात उपोषणकर्त्यांना भेट देऊन गेलेही मात्र मनमाड शहराध्यक्ष यांना सुद्धा हे कळले नाही याची मोठया प्रमाणातचर्चा सुरू असुन खासदार यांच्यासोबत राहणारे स्वतःलाच खासदार समजुन भगरे यांनी कुठे जायच कुठं नाही जायच कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हे तेच ठरवत आहे मुळात डॉ भारती पवार यांचा पराभव त्यांच्या अशाच वृत्तीच्या पीए व काही कार्यकर्त्यांमुळे झाला होता त्यांनी जिथे लोकप्रतिनिधीची गरज आहे तिथे त्यांना पोहचूच दिले नाही असाच काहिंसा प्रकार भगरे सर यांच्यासोबत सुरू झाला असुन चहापेक्षा किटल्या गरम झाल्या आहेत.
दिंडोरी लोकसभा निवडणुकीत नवख्या खासदार भास्कर भगरे यांना जनतेने भरभरून मतदान दिले विरोधकांच्या अनेक राजकिय खेळी फोल ठरवत जनतेने त्यांना  मतदान केले व जायंट किलर म्हणून भगरे निवडून आले डॉ भारती पवार यांना त्यांच्या पीए संस्कृती व उर्मट कार्यकर्त्यांनी पराभव दाखवला असाच काहीसा प्रकार भगरे यांच्यासोबत सुरू झाला असुन त्याच्यासोबत राहणारे स्वतःला खासदार समजून घेत भगरे यांनी कुठे जायचे आणि कुठे नाही जायच हे ठरवायला लागले आहेत काल भास्कर भगरे हे मनमाड नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील उपोषण स्थळी भेट देण्यासाठी आले मात्र मनमाड शहराध्यक्ष सुधीर पाटील यांना त्याची पुसटशी कल्पना देखील नव्हती मुळात शहरातील कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या नेत्यांना कल्पना नव्हती हे सगळं झेरॉक्स खासदार करत असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती मुळात जनतेने निवडून दिले आहे तर जनतेशी संपर्क ठेवला तर बिघडते कुठे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.भगरे सर आपण साधे सरळ आहात आपण या कपटी व संधीसाधू राजकीय मंडळींच्या जाळ्यात अडकून आपली प्रतिमा जनसामान्यांच्या मनात मलिन करू नका अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

9 hours ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

1 day ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

2 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

2 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

2 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

4 days ago